कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील सापटणे (भो) गाव १५ वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीत गटा-तटातील अंतर्गत मुद्द्यावरून गुद्यावर येतात. त्यामुळे कोणतीही निवडणूक लागली की गावात एक प्रकारची दहशत जाणवायची. त्यामुळे या गावाला काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केले आहे. यातून मागे गावच्या विकासाला बसलेला फटका पाहता यंदाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविराेध करीत नऊच उमेदवार उभे केले आहेत.
ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध होणारे सापटणे (भो) गाव मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत कार्यकर्ते एकमेकांच्या कट्टर विरोधात उभे ठाकले असायचे. यामुळे या गावाला याचा खूप मोठा फटका बसला आहे. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत झाले गेले विसरून जात सर्व गटांबरोबरच ग्रामस्थही एकत्र आले. होणारे नुकसान पाहाता गाव बिनविरोध करायचे ठरले. खरोखरच त्यांनी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज देऊन गाव बिनविरोध केले आहे.
बिनविरोध झालेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे : बालाजी गणपत गिड्डे, राजेंद्र भारत भालेराव, रोहिणी किसन राऊत, स्वाती हनुमंत गिड्डे, बालाजी अनिल अवचर, अनिता शंकर मुसळे, जयश्री तानाजी गोरे, दीपाली सखाहरी गिड्डे, बाळू निवृत्ती माळी असे आहेत. यंदा आपापसांतील वाद विसरून गावाच्या विकासासाठी गाव बिनविरोध करण्यात गावातील नेते माजी सरपंच हनुमंत गिड्डे, पैलवान अस्लम काझी, युवराज राऊत, माउली गायकवाड, सचिन रणदिवे, किसन राऊत, संतोष गोरे, औदुंबर रणदिवे, बिभीषण राऊत, नसीर शेख, बाळू बागल आदींनी खूप परिश्रम घेतलेले आहे.
...........
फोटो : ०६ सापटणे
सापटणे(भो), ता. माढा या अतिसंवेदनशील गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून जल्लोष करताना हनुमंत गिड्डे, अस्लम काझी, बिभीषण राऊत, युवराज राऊत, माउली गायकवाड, नसीर शेख.