बार्शी : तालुक्यातील एका गावात महिला तिच्या घरासमोरील झाडलोट करताना, एका ओळखीच्या इसमाने जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिच्याशी अश्लील वर्तन करून काठीने मारहाण केली. १६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा बार्शी तालुका पोलिसात तक्रार देताच, दत्ता नानासाहेब गव्हाणे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील पीडित महिला गुरुवारी नेहमीप्रमाणे घरासमोरील शेण झाडलोट करत होती. त्यावेळी त्याने तेथे येऊन जुन्या भांडणाचा राग मनात धरून पीडित महिलेशी असभ्य वर्तन केले. तिला शिवीगाळ दमदाटी व लाकडी काठीने डाव्या व उजव्या हातावर मारहाण करून जखमी केले. याबद्दल तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार एच.एम. वाघमोडे करत आहेत.
----