सांगोला : आजकाल कोणाला कशाचा छंद जडेल हे सांगणे कठीण आहे परंतु दुष्काळाच्या झळा सोसणाºया सांगोला चांडोलेवाडी येथील मेंढपाळास माडग्याळ जातीच्या मेंढ्या जोपासण्याचा छंद जडला आहे. त्यांनी या छंद व हौसेपोटी तब्बल १ कोटीचे भांडवल गुंतवून मेंढ्याबरोबर नर मेंढा पाळला आहे़ त्यांच्याकडे असणाºया नर जातीच्या माडग्याळ मेंढ्याला तब्बल २७ लाखाची मागणी आल्याने सोशल मीडियावर त्यांच्या ‘सर्जा’ मेंढ्याने चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून येत आहे.
सांगोला चांडोलेवाडी येथील मेंढपाळ बाबू मेटकरी यांनी शेतीबरोबरच गेल्या १५ वर्षापासून माडग्याळ जातीच्या मेंढ्या पाळण्याचा छंद जोपासला आहे, त्यांनी हौसेपोटी जातीवंत माडग्याळ जातीचा नर मेंढाही जोपासला असून त्याच्या कपाळावर राघूची चोची असल्याने या मेंढ्याला मोठी मागणी आहे़ सध्या त्यांच्याकडे माडग्याळ जातीच्या लहान-मोठ्या ५० मेंढ्या आहेत. त्यांनी या मेंढ्यानाच आपली १० एकर बागायत शेती मानून वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असल्याचे ते सांगतात.
सध्या बाबू मेटकरी यांच्या माडग्याळ जातीच्या नर मेंढा ‘सर्जा’याने सोशल मीडियावर चांगलाच भाव खाल्ला आहे़ माण, खटाव, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला या माणखो-यात माडग्याळ जातीची मेंढरे पाळणाºयांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर कर्नाटकातील इंडी येथेही मेंढपाळ माडग्याळ मेंढ्या मोठ्या संख्येने पाळतात.