मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस ठाण्यातील नऊ तर डीवायएसपी कार्यालयातील दोन अशा एकूण ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची फीत लावण्यात आली. दरम्यान, मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराचा पोलीस नाईक झाल्याचा पहिला मान कृष्णा जाधव यांना मिळाला आहे.
जिल्हा पोलीस दलातील विविध पदांवर काम करणार्या कर्मचाऱ्यांना ज्यांची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक फौजदार अशी पदोन्नती देण्यात आली. यामध्ये डीवायएसपी कार्यालयातील पोलीस शिपाई अभिजीत साळुंखे, सुनील पवार या दोघांना पोलीस नाईकची पदोन्नती मिळाली आहे, तर मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हणुमंत हिप्परकर (सहायक फौजदार), तुकाराम कोळी, दत्तात्रय येलपले, राजकुमार ढोबळे या तिघांना पोलीस हवालदार, तसेच दर्लिंग गुरव, सचिन बनकर, कृष्णा जाधव, प्रकाश नलवडे, बापू नलवडे या पाच जणांना पोलीस नाईकची पदोन्नती मिळाली आहे. या सर्वांना पदोन्नतीची फीत लाऊन पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी त्यांचे स्वागत केले.
----
ओळी - मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची फीत लावताना पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे.
230721\img-20210723-wa0019-01.jpeg
फोटो ओळी - मंगळवेढा पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या हस्ते पदोन्नतीची फित लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे.