कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांना योग्य औषधोपचार करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकदा शासकीय व्यवस्थेला मर्यादा येतात. यातूनच तालुक्यातील आरोग्य विभागात संभाव्य औषधांचा तुटवडा व तातडीची गरज लक्षात घेऊन तहसीलदार माने यांनी स्वत:च्या खर्चातून पॅरासिटॅमल टॅब, सिट्रीझन टॅब, अजिथ्रोमायसिन टॅब, व्हिटॅमिन सी टॅब, व्हिटॅमिन बी टॅब, डायक्लोफिनॅक टॅब, ॲमाॅक्सिन टॅब, ओमेप्रायझोल टॅब, ओंडामसेक्टाॅन टॅब, कफ सिरप अशी औषधे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
संबंधित औषधांचा उपयोग हा तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक या आरोग्य विभागामार्फत आवश्यकतेनुसार, कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षात ठेवलेल्या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. या वेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, पं. स. सदस्य ॲड. राहुल सावंत, माजी सभापती शेखर गाडे, नायब तहसीलदार जाधव, बदे, संतोष गोसावी आदी उपस्थित होते.
२४ करमाळा-हेल्प
ओळी : करमाळ्यातील कोरोनाबाधित रुणांच्या इलाजासाठी गोळ्या, औषधांचा साठा देताना तहसीलदार समीर माने.