आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : सरकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांशी सौजन्याने बोला, त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या, त्यांच्यावर रागावू नका, त्यांच्या शंकाचे निरसन करा, तुमच्या चांगल्या निर्णयावर त्यांचे जीवन उभारू शकते याचे भान ठेवा, कार्यालयीन वेळेत पूर्ण सेवा द्या, अशा शब्दात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शासकीय अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या़दक्षिण सोलापूर पंचायत समितीची आमसभा शिवछत्रपती रंगभवन येथे पार पडली़ अध्यक्षस्थानावरून बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तालुका वैभवशाली बनवण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय असला पाहिजे़ कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून कामे मार्गी लागली पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली़रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन,जलसंधारण, सिंचनाच्या असुविधा यावर आमसभेत चर्चा झाली़ पशुसंवर्धन विभागाच्या चर्चेला अधिक ताणाताणी झाली़ भीमा-सीना नदीत पाणी सोडण्याची, सीना नदीवरील वीज बिले माफ करणे, संपूर्ण कर्जमाफी आदी मुद्दे लावून धरण्यात आले़ निकृष्ट रस्त्यांच्या कामांची चौकशी, जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या़ लेखी तक्रारी करा, त्रयस्थ यंत्रणेकडून कामांची चौकशी करू, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले़ गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी प्रास्ताविकात विकासकामांचा आढावा घेतला़ यावेळी व्यासपीठावर सभापती ताराबाई पाटील, उपसभापती संदीप टेळे, जि़प़सदस्य आणाप्पा बाराचारे, प्रभावती पाटील, विद्युलता कोरे, रेखाबाई गायकवाड, पं़स़सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, श्रीशैल नरोळे, धनेश आचलारे, सोनाली कडते, शालन चव्हाण, महादेव तथा एम़डीक़मळे, शशिकांत दुपारगुडे, मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, शिरीष पाटील आदी उपस्थित होते़ इन्फो बॉक्स़़़़़़़़अभिनंदनाचे ठरावसुभाष देशमुख यांचा राज्यमंत्री मंडळात सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री म्हणून समावेश झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव यतीन शहा (भंडारकवठे) यांनी मांडला़ सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना सहकारी सोसायटीचे सभासदत्व देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारे विधेयक विधीमंडळात सादर केल्याबद्दल सहकारमंत्री देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपाचे मधुकर चिवरे यांनी मांडला़ टाळ्यांच्या गजरात एकमताने ठरावाचे स्वागत करण्यात आले़ -------------------आमसभेत केलेल्या मागण्या़- जिल्हा परिषद शाळांची वीजबिले थकल्यास त्यांची वीजजोडणी तोडू नयेत : सिध्दाराम हेले- एकरूख सिंचन योजना सुरू करा, पाणीपुरवठ्यासाठी मागणीनुसार पुरवावेत : धनेश आचलारे- सीना नदीला पाणी सोडा : अशोक देवकते- वडापूर बंधारा बांधा, भीमा-सीना नदीत हिळ्ळीपर्यंत पाणी सोडा, संपूर्ण कर्जमाफी द्या : महामूद पटेल- तीन वर्षे सीना नदी कोरडी असल्याने सीनाकाठच्या शेतकऱ्यांची वीजबिले माफ करा : सतीश शिंदे- आठमाही धोरणानुसार आॅक्टोबर ते मे महिन्यात भीमा-सीना नदीत पाणी सोडा : रावसाहेब व्हनमाने- ३० वर्र्षांपूर्वी बांधलेले कालवे, वितरिका दुरूस्त करून पाणी सोडा - सायबण्णा बिराजदार- नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा कालावधी वाढवा, कुरघोटचा बेकायदेशीर कत्तलखाना बंद करा : अख्तरताज पाटील-------------------------बसवनगर सोसायटीची चौकशीबसवनगर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांच्यासह सर्वच सभासद कार्यक्षेत्राबाहेरील आहेत़ या सोसायटीची चौकशी करून ती तातडीने बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच राठोड यांनी केली़ यावर बसवनगरसह अन्य गावात बोगस सभासद असतील तर लेखी तक्रारी द्या, त्यावर तातडीने कारवाई करू, असे स्पष्टीकरण सहा़ निबंधक बालाजी वाघमारे यांनी दिले़ गरज असेल तिथे नवीन सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव द्या, तातडीने मंजुरी देऊ, सहकाराचे शुध्दीकरण करण्याच्या मोहिमेला माझ्याच मतदारसंघात सुरूवात करतो, अशी टिप्पणी सुभाष देशमुख यांनी दिली़ ----------------------शिंगडगावचा वाद चव्हाट्यावऱ़़़शिंगडगाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या निकृष्ट कामांकडे सूर्यप्रकाश कोरे यांनी कृषी विभागाचे लक्ष वेधले असता स्थानिक राजकारण चव्हाट्यावर आले़ सरपंच लक्ष्मणकांत पनशेट्टी आणि सूर्यप्रकाश कोरे परस्परावर धावून गेले़ त्यामुळे आमसभेत तणाव निर्माण झाला़ सहकारमंत्र्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवा, विकासाच्या प्रश्नासाठी ही आमसभा असल्याची जाणीव करून देत उभयंतात मध्यस्थी केली़
अधिकाऱ्यांनो कामासाठी आलेल्या नागरिकांशी सौजन्याने वागा : सहकारमंत्री सुभाष देशमुख
By admin | Published: April 15, 2017 6:10 PM