सांगोला तालुका अवर्षण प्रवणक्षेत्र असून सतत दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात वृक्षलागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण करून त्याचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य व सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने १० वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. याबाबतची जनजागृती करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १० वृक्षारोपण करून ७ दिवसांच्या आत तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे फोटोसह सादर करावा, असे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::
येत्या दोन दिवसांत सांगोला वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे १ हजार वृक्ष कोतवाल, पोलीस पाटील यांना वाटप केले जातील. त्यानुसार ते परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनासाठी मदत करणार आहेत.
- अभिजित पाटील
तहसीलदार, सांगोला