शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:59 PM

बिहारीबाबू, बंगालीदादा निभावताहेत माथाडीची भूमिका; ट्रान्स्पोर्ट अन् डाळ कारखान्यात रोजगार 

ठळक मुद्देबिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेतमुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेतेसोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : भारतातील काश्मीर म्हणजं जणू भूतलावरील स्वर्गच... साडेसहा किंवा त्यापेक्षाही अधिक फूट उंच असलेली तिथली देखणी माणसं ट्रान्स्पोर्टमध्ये ओझं उचलताना अगदी निष्ठेने माथाडी कामगाराची भूमिका निभावत असतात. इथल्या बहुतांश डाळ कारखान्यातही बंगालीदादा, बिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेत. मुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेते. 

सोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात. एकीकडे सोलापुरात रोजगार नाही म्हणून इथली मंडळी इतरत्र स्थलांतर करीत असताना मात्र दुसरीकडे रोजगारासाठी जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल येथील अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी सोलापुरात दाखल होत असतात. सोलापूरची चादर आणि टॉवेल्स सातासमुद्रापार गेली आहे. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये अनेक यंत्रमाग कारखाने आहेत. या कारखान्यातील टॉवेल्स, चादरी परप्रांतात तर जातातच. शिवाय परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. यामुळे ट्रान्स्पोर्ट नगरी म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या जोडभावी पेठेत अनेक मालवाहतूक करणाºया नामवंत कंपन्या आहेत. दररोज दोन-अडीचशे ट्रक भरून इथल्या चादरी आणि टॉवेल्स परप्रांतात जात असतात.

काही मालांची मुंबईमार्गे जहाजातून परदेशात निर्यात होत असते. चादरींच्या गाठी अन् टॉवेल्सचे कार्टून ट्रकमध्ये भरताना काश्मिरी माणसं थकत नाहीत. चादरींचा एक गाठ असो अथवा टॉवेल्सचे कार्टून... अगदी पाठीवर घेऊन ते फाकळ्यावरून (फळीवजा शिडी) अलगदपणे ट्रकमध्ये भरतात. काही वेळेतच ट्रक लोड करून त्याचा निरोप घेतात न् घेतात तोच ते दुसºया ट्रकमध्ये माल भरण्याच्या तयारीत असतात. ना कधी कामाची कटकट करतात ना कधी आपली गाºहाणी मांडतात. ट्रान्स्पोर्ट चालकही या मंडळींच्या कामावर जाम खूश असतात. शिफ्टवाईज काम चालत असल्याने प्रत्येकाला थोडी विश्रांती अथवा उसंत मिळते. या लोकांना राहण्याची खास व्यवस्थाही ट्रान्स्पोर्ट चालकांनी केलेली असते. घरातल्या सदस्यांप्रमाणे यांना प्रेम मिळत असल्याने ही मंडळी पूर्णत: इथल्या संस्कृतीत समरस होऊन गेली आहेत. 

डाळ कारखानदारही असतात निश्ंिचत...- सोलापुरात अनेक डाळ कारखाने आहेत. मूग, तूर, हरभरा, मटकी, उडीद आदींवर प्रक्रिया करण्यापासून ते तयार झालेला माल ट्रक, टेम्पोमध्ये भरेपर्यंतचे सर्वच काम राजस्थान, उत्तरप्रदेश, बंगालीदादा अन् बिहारीबाबू करीत असतात. डाळ प्रक्रियेचा अभ्यासही या मंडळींना अवगत आहे. त्यांच्यावर संपूर्ण कारखाना सोपवून गेल्यावरही हे कामगार जणू विश्वासाने काम तडीस नेतात. म्हणूनच डाळ कारखानदारही निश्ंिचत असतात. बिहारीबाबू बलरामसिंग, विश्वजित सांगत होते, ‘साब, शोलापूर हमारे लिये लकी है. चार पैसे मिलते हैं और उसमें से आधा पैसा घरको भेजे देतें हैं. साल-दो साल बाद गाँव लौट जातें हैं!

काम संपल्यावर बनतात एकेक जण आचारी- दिलेले काम वेळेत आटोपून परप्रांतीय कामगार सायंकाळी स्वयंपाकाला लागतात. दररोज जेवण बनविण्याची एकावर जबाबदारी येते. त्याला मदतीसाठी दोघे-तिघे असतात. विशेषत: भात अन् त्याबरोबर एखादी भाजी असली तर कामासाठी आलेले हे सवंगडी अंगत-पगंत करून जेवणाचा लाभ घेतात. या कामगारांच्या आरोग्याची काळजीही डाळ कारखानदार घेत असल्यामुळे दोघांमधील एक वेगळे नाते दिसून येते. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश