शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

अरे बाप रे; बायको म्हणे फेकतेय अंगावर मोबाईल; वारंवार देते आत्महत्येची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 3:34 PM

हिला समस्या तक्रार निवारण केंद्राकडे पतीराजांच्या तब्बल १७२ तक्रारी

सोलापूर : पत्नीकडून वारंवार आत्महत्येची धमकी देणे, शिवीगाळ करणे, प्रसंगी मारहाण करणे अशा विविध कारणांवरून छळ केल्या प्रकरणी कोरोनाच्या काळात महिला तक्रार निवारण केंद्राकडे पतीराजांकडून १७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये संसारामध्ये सासू-सासऱ्यांचा वाढता हस्तक्षेप, वारंवार घेतला जाणारा संशय अशा कारणांचाही समावेश आहे.

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च २०२० रोजी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी जारी केली होती. संचारबंदीमुळे पती बहुतांशी वेळ घरात राहत होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये पती-पत्नीमध्ये वाद होत होता. किरकोळ कारणावरून पत्नी पतीला वेठीस धरायच्या. काहीकेल्या पत्नी ऐकत नसल्याने अनेक पतींनी तिच्याविरुद्ध शहर पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार समस्या निवारण केंद्रात धाव घेतली.

पत्नी माझ्यावर संशय घेऊन स्वतःबरोबर मुलांना घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. तिच्या आई-वडिलांचे ऐकून घरामध्ये सतत भांडण काढते. माझ्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून मला वेगळे राहण्याचा आग्रह करीत आहे. मला माझ्या पत्नीकडूनच धोका आहे, अशा एक ना अनेक तक्रारी पतीदेवाने केल्याचे दिसून येत आहे.

मानसिक छळ नव्हे, तर मारहाणही करते

  • - एका पतीने पत्नीला तू माहेरच्या लोकांना फोनवर इतका वेळ का बोलत असते, अशी विचारणा केली होती. त्यावर चिडलेल्या पत्नीने पतीला मोबाइल फेकून मारला. त्यानंतर मारण्यासाठी अंगावर धावून गेली होती.
  • - कोरोनात सारखे घरात राहिल्यामुळे पत्नीच्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष जात होते. चुकलेल्या गोष्टीसंबंधी विचारणा केली असता एका पत्नीने पतीला चपलेने मारल्याचाही प्रकार समोर आला आहे.
  • - सासू-सासरे यांच्यासोबत वाद होताना मध्यस्थी करणाऱ्या पतीला सासरच्या लोकांकडून मारहाण झाली असल्याची तक्रारही प्राप्त झाली आहे.

 

कोरोना काळात वाढल्या तक्रारी

- कोरोनापूर्वी पती कामानिमित्त बाहेर असल्याने तक्रारी होत नव्हत्या. मात्र संचारबंदीमुळे घरात एकत्र राहिल्याने किरकोळ कारणावरून सतत वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. नातेवाइकांनी अनेकवेळा सांगूनही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या काळात पत्नीविरुद्ध तक्रारी करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

आर्थिक टंचाई अन्‌ सतत घरात

  • - कोरोना काळामध्ये अनेक पतींच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांच्या पगारामध्येही कपात झाली. आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे नेहमीप्रमाणे गरजा भागत नव्हत्या. घरात हे नाही ते नाही, असे म्हणत पत्नी वारंवार पतीसोबत भांडण करीत असल्याच्या तक्रारींचाही यात समावेश आहे.
  • - बऱ्याच जणांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले होते. कामाच्या वेळा कमी झाल्या होत्या, त्यामुळे घरातील सहवास वाढला. यामुळे एकमेकांच्या चुका काढून भांडणे झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.

 

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

- पत्नीला साधी शिवीगाळ केली तरी पोलिसात लगेच तक्रार घेतली जाते. गुन्हा नोंदला जातो. मात्र पत्नी विरुद्ध तक्रार करण्यास गेल्यानंतर पोलीस दखल घेत नाहीत. महिलांच्या प्रत्येक समस्येसाठी कायदा आहे, मात्र आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी तो निमूटपणे सहन करावा लागतो. आम्ही न्याय मागायला गेलो तर प्रथमत: आमच्याकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. आमच्या बाजूने कोण लढणार?

बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी

  • २०१८ - १०१
  • २०१९ - १४०
  • २०२० - १२०
  • २०२१ - ५२
टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला