शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी

By विलास जळकोटकर | Published: July 21, 2024 6:19 PM

ट्रकनं उडवलं : अक्कलकोट रोडवर अपघात

सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनानमुळे अपघात वाढत आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवर कमला को ऑप. बँकेच्या कॉर्नरवर पायी चालत निघालेल्या वृद्धाला केमिकलच्या टँकरने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश कोटय्या श्रीमल (वय ६५, रा. जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. 

एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस १०६ (१) अन्वये मृत्यूस कारणीभूत गुन्हा नोंदला आहे. आतिक इब्राहिम शेख (वय ४६, रा . संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या चालकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एम. एच. १३ सी यू ५५७७ क्रमांकाची केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन (मालट्रक) रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवरुन अक्कलकोटकडे निघाले होते. या दरम्यान कमला को ऑप बँकेच्या कॉर्नरजवळून वरील मयत वृद्ध पायी चालत निघाला होता. चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने पादचाऱ्यास जोराची धडक बसली. पादचारी रोडवर कोसळल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला.

या अपघाताची खबर मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मयताची सून बालमनी श्रीमल यांनी तातडीने वृद्धाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन सदर वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू