आज शेताकडे जायला उशीरच झालं.. कारणही तसंच होतं...कारण आमच्या आप्पाला सोबत घेऊन जायचं होतं.. ‘आज थोडासा वेगळाच विचारत होते .म्हटलं शेताकडे जाऊन बरेच दिवस झाले होते... आज ‘रानमेवा खायचं’ वाटेत येत असताना बºयाच ... बोरांची झाड होती. ‘पण काहीसं आंबट-गोड होती ... म्हटलं आपल्या शेताकडे बांधावर आहेत. ‘कशाला काळजी करायची ? ‘तितक्यात शेत जवळ आलं.. शेताच्या वस्तीवर गाडी लावली. थेट निघालो (बोर ) अर्थात रानातील रानमेवा हुडकायला़ मग काय गेलो बांधावर असं रांगेने शेत म्हटल्यावर ... बोराची झाडी निश्चित असणारच.
साधारणत: गुराखी पोरांचा त्या झाडांवर डोळा असायचा अन् त्यांनी गुरे चारता चारता झोडपून बोरं खायची, हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजला जात असे. शिवाय शाळा चुकवून रानोमाळ हिंडणाºया पोरांनी तरी हा रानमेवा हक्काने खायचाच असे ठरलेले. बायका बोरे झोडपून नेतात. बोरं म्हटल्यावर कोणाला तोंडाला पाणी सोडणार नाही. बोरं खाता खाता लहानपणीची आठवण आली... शाळेत असताना शाळेच्या गेटसमोर.. ‘एक आजीबाई १ रुपयाला एक लहान वाटी द्यायची़ मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर मात्र त्या आजीकडे बोरं घेण्यासाठी गर्दी जमत असे, पण आताच्या मुलांना मात्र कुरकुरे, चॉकलेटसाठी आईवडील हौसेनं पैसे देतात़ आता काळ बदललंय. ‘आता ते दिवस राहिले नाहीत, राहिल्या फक्त आठवणी. आजकाल हे काय होतं आहे बºयाच शेतकºयांनी ही झाडं काय कामाची म्हणून ती नष्ट करत आहेत.बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ. याचा फार मोठा वृक्ष होत नाही. आणि या झाडांना काटे असतात. याच्या बियांना आटोळी म्हणतात.
महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ विभागात बोरची काटेरी झुडपे आढळतात. उमराण, चण्यामण्या बोर, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, बनारसी बोर, बाणेरी बोर ही झाडं बिनपाण्याचं येतात़ आम्हीतर खातोच, त्यात पोपट व बुलबुल असे आणखी काही पक्षी आवडीने खातात. विशेष सांगायचं तर बोरांच्या झाडावर छोट्या पिवळ्या, राखाडी चिमण्यांची घरटी दिसून येतात. विहिरीच्या काठावर असणाºया बोरांच्या झाडावर १०-१५ च्या संख्येने सुगरणीची घरटी आढळून येतात. झाडांच्या पानावर कॉमन पिरो, कॉमन सिल्व्हरलाईन फुलपाखराच्या अळ्या आढळून येतात. पक्षी, फुलपाखरांकरिता उपयुक्त असणाºया या झाडांचा आयुर्वेदात चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.बोराचे मूळ, फळ, फुलं औषधे बनविण्याकरिता वापरतात. हे फळ खायला पौष्टिक तर आहेच आणि रानमेवाही होतो. बोराचे झाड शेताच्या बांधावर आपोआप येते. मुद्दाम कोणी बोराचे झाड लावत नाही. कोणी तसे लावल्याचे ऐकिवातही नव्हते. आपल्या बांधावर परंपरेने चालत आलेले एखादे झाड असतेच . आमच्या शेतात तर बºयापैकी बोराची झाडे आहेत. आजही तो विचार केला़ पोटात कावळे ओरडत होते चला तर रानमेवाच खाऊया मस्तपैकी झाडाखाली बसूऩ वेचायला चालू केलं आणि खायला़ मी लहानपणी असताना खिसा भरून खायचो. वरचा खिसा, पँटमधील दोन्ही खिशात गच्च भरलेला असायचं पण आपल्या आवडीच्या खाद्यासाठी थोडासा लहान व्हायला काय हरकत आहे. मस्त एखादं आंबट असायचं आणि दोन-चार गोड असायचे़असेच करता करता बºयापैकी बोरं खाल्ली मन अगदी प्रसन्न झालं. शेताकडची वेचून खाल्लेली बोरं किती गोड लागतात ना! एकदा तुम्ही अनुभवा. - बसवराज बिराजदार(लेखक हे निसर्ग अभ्यासक आहेत़)