सोलापूर - आजच्या कार्यक्रमाला शरद पवार येतील की नाही याबाबत शंका होती. नानासाहेब काळे यांच्या कार्यक्रमाला ते आले होते. आज त्यांचा मुलगा दत्तात्रय काळे यांच्याही कार्यक्रमाला आले. एवढा मोठा माणूस शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला येतो, यातून देशाला एक संदेश जातो, शेतकऱ्यांची तपश्चर्या यामुळे देशात जाते. शरद रावांनी एकदा मनात आणलं तर बरोबर कार्यक्रम करतात अशी मिश्किली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला.
राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, दिल्लीत मी त्यांच्या सोबत सरकारमध्ये बसलो. आमच्यात कोणतंही अंतर नाही असे प्रतिपादन काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.