शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रगल्भ, क्रिएटिव्ह अन् अधिक कल्पनाशक्ती असलेले सोलापुरातील दीडशे डावखुरे एकवटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 3:39 PM

जागतिक डावखुरा दिन : मोदी, ओबामा, बिल गेट्स, अमिताभ बच्चनही लेफ्टी

ठळक मुद्देउजवे असणारे कुठलीही वस्तू सहजपणे हाताळतात. मात्र डावखुºयांसाठी ती अडचणीची ठरतेडावखुºयांसाठी इस्त्री, कात्री, आॅर्गन (बुलबुल), गिटार आता बाजारात उपलब्ध आहेतअन्य काही वस्तू डावखुºयांसाठी याव्यात, अशी अपेक्षा डावखुºया मंडळींनी व्यक्त केली

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : डावखुरे अर्थातच डाव्या हाताचे... ही मंडळी प्रगल्भ, क्रिएटिव्ह असतात. त्यांची कल्पनाशक्ती उजव्यांपेक्षा अधिक सरस असते. सोलापुरात स्थापन करण्यात आलेल्या संघटनेत दीडशे डावखुरे एकवटले आहेत. डावखुºयांविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी व्याख्यानं घेतली गेल्याचे सोलापूर लेफ्ट हॅन्ड असोसिएशनचे अध्यक्ष आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. शिरीष आहेरकर यांनी जागतिक डावखुरा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ला सांगितले. 

सर्वच क्षेत्रांमध्ये डावखुºयांनी आपला एक ठसा उमटवला आहे. अहिंसावादी महात्मा गांधी हे डावखुरे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा, बिग बी अमिताभ बच्चन, रतन टाटा हेही डावखुरे असल्याचा आम्हा डावखुºया मंडळींना अभिमान असल्याचेही प्रा. आहेरकर यांनी सांगितले. मातेच्या गर्भात अर्भकाची वाढ होत असताना त्याच्या कुठल्या मेंदूचा विकास होतो त्यावर जन्मणारे बाळ हे उजवे की डावखुरे याचा अंदाज बांधता येतो. जर उजव्या मेंदूचा विकास अधिक होत असेल तर समाजावे की जन्मणारे ते बाळ डावखुरे (लेफ्टी) असते. 

जेव्हा बाळाचा जन्म होतो आणि पुढे जसजशी त्याची वाढ होते तेव्हा बाळाने जो हात अधिक पुढे करेल त्यावर ते बाळ उजवे की डावखुरे ओळखायला वेळ लागत नाही. त्याच्यासमोर एखादी वस्तू पुढे  केली की, ती घ्यायला डावा हात  पुढे येत असेल तर माता-पित्यांनाही चिंता लागून राहते. डावखुरे मुले जन्माला येण्याला कारणीभूत म्हणजे अनुवंशिकपणा, असे डॉक्टर सांगतात. 

डावखुरी मुले ओळखण्याची प्रमुख दोन लक्षणे आहेत. दोन्ही हातांनी टाळी वाजवताना त्यांचा डावा अंगठा उजव्या अंगठ्यावर येणे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी डावा हात पुढे जाणे ही प्रमुख लक्षणे मानली जातात. 

डावखुºयांविषयीचे गैरसमज व्याख्यानातून दूरसोलापुरात लेफ्ट हॅन्ड असोसिएशनची स्थापना करण्यात आली. शहरातील दीडशे जणांनी या संघटनेचे सदस्यत्व घेतले. समाजात डावखुºयांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुण्यातील एका अभ्यासकाचे व्याख्यान आयोजित करून असोसिएशनने प्रयत्न केले. जागतिक डावखुºया दिनानिमित्त यावर विशेष भर दिला जातो, असे डॉ. शिरीष आहेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

क्रीडा क्षेत्रातही डाव्यांचे वर्चस्व..क्रीडा क्षेत्रातही डावखुºया खेळाडूंनी एकापेक्षा एक सरस विक्रम केले आहेत. क्रिकेटमध्ये आजवरचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स डावखुरा होता. हा योगायोग नाही. तो मैदानावर काहीही करू शकायचा. फलंदाजी, जलद गोलंदाजी, फिरकी... फक्त स्वत:च्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करू शकत नव्हता. पण सगळं डाव्या हातानेच. सुलतान आॅफ स्विंग वसीम अक्रमही डावखुरा होता. लारा, गांगुली आणि अनेक नामांकित खेळाडू डावखुरे होते. अगदी सचिन तेंडुलकरही डावखुरा आहे. एकूणच खेळात डावखुºया मंडळींचे मोठे वर्चस्व राहिले आहे. 

डावखुºयांसाठी वस्तूंचीही निर्मितीउजवे असणारे कुठलीही वस्तू सहजपणे हाताळतात. मात्र डावखुºयांसाठी ती अडचणीची ठरते. डावखुºयांसाठी इस्त्री, कात्री, आॅर्गन (बुलबुल), गिटार आता बाजारात उपलब्ध आहेत. अन्य काही वस्तू डावखुºयांसाठी याव्यात, अशी अपेक्षा डावखुºया मंडळींनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर