शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

सौद्याअभावी दीड लाख टन बेदाणा पडून; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 9:09 AM

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणानिर्मिती केली जाते. बेदाण्यासाठी तासगावची बाजारपेठ नामांकित असल्याने  तेथील गुदामात विविध जिल्ह्यांतून बेदाणा साठवला जातो.

कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बेदाण्याचे सौदे न  झाल्याने बेदाण्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुदामात सुमारे दीड लाख टन बेदाणा पडून असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक  कोंडी  झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बेदाणा आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणानिर्मिती केली जाते. बेदाण्यासाठी तासगावची बाजारपेठ नामांकित असल्याने  तेथील गुदामात विविध जिल्ह्यांतून बेदाणा साठवला जातो. सौदे बंद असल्याने याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ऑनलाइन बेदाणा खरेदी व विक्री सौदे करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे. सध्या सांगलीच्या गोदामात १.५० लाख टन बेदाणा पडून आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाण्याचा समावेश आहे. बेदाण्याचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो १८० ते २३० रुपये आहे. यापोटी अंदाजे १२०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 

लॉकडाऊनमुळे बेदाणा सौदे बंद आहेत. त्यामुळे माल पडून आहे. चालू हंगामात मशागत करण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांकडे पैसेही नाहीत. त्यामुळे ऑनलाइन सौदे सरकारने सुरू करावेत किंवा आर्थिक मदत जाहीर करावी.- नितीन कापसे, द्राक्ष बागायतदार, कापसेवाडी

टॅग्स :SolapurसोलापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र