पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ पुणे येथील मे़ बीएसए कॉर्पोरेशन लि़ या संस्थेच्या १०२ प्रशिक्षित कर्मचाºयांकडून १५ एप्रिलपासून अद्ययावत यंत्रसामुग्रीद्वारे तीन शिफ्टमध्ये हे काम केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली़
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून रोज हजारो भाविक पंढरीत येतात़ मंदिर परिसर स्वच्छ असावा, अशी भाविकांची इच्छा होती़ तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले हेसुद्धा सुरुवातीपासूनच मंदिर परिसर स्वच्छतेबाबत आग्रही होते़ त्यानुसार ई-निविदा प्रक्रिया राबवून मे़ बीएसए कॉर्पोरेशन लि़ यांना या कामाचा ठेका मिळाला आहे़ ३ एप्रिल रोजी या संस्थेस कार्यादेश देण्यात आला़ प्रत्यक्षात १५ एप्रिलपासून कामाला सुरुवात होणार आहे़
यावेळी मंदिर समिती सदस्य सचिन आधटराव, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी रवींद्र वाळूजकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
या स्वच्छता कामाचे सनियंत्रण व मूल्यमापनासाठी मंदिर समिती सदस्य व कार्यकारी अधिकारी हे स्वत: लक्ष देणार आहेत़ स्वच्छतेचे काम परिणामकारक होण्यासाठी संबंधित कंपनीस सूचना करण्यात येणार आहेत़ चंद्रभागा वाळवंट व पालखी प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी पंढरपूर नगरपरिषदेने सर्व बाबतीत मंदिर समितीला व संबंधित कंत्राटदार कंपनीला सहकार्य करणे अपेक्षित आहे़ या स्वच्छता कामासंदर्भात कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर परिसरातील व्यापाºयांची बैठक घेतली़ यामध्ये व्यापारी प्रतिनिधींनी स्वच्छता कामासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे़
स्वच्छतेसाठी अद्ययावत यंत्रसामुग्रीच्श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता १०२ प्रशिक्षित कर्मचारी ३ शिफ्टमध्ये करणार आहेत़ ते सिंगल डिस्क स्क्रबर, हाय पे्रशन जेट, वेट अॅण्ड ड्राय व्हक्युम क्लीनर, स्क्रबल ड्रायर, गारबेज ट्रॉली, विंगर ट्रॉली, ग्लास क्निनिंग किट, टेलिस्कोपिक पोल, सेफ्टी लॅडर अशी अद्ययावत यंत्रसामुग्री, स्वच्छता साहित्य व केमिकल्सचा वापर करण्यात येणार आहे़
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता करणे हे नित्याचे आणि व्यापक स्वरुपाचे काम आहे़ त्यामुळे या कामासाठी भाविक, व्यापारी, स्थानिक नागरिक, संस्था, स्थानिक प्रशासन या सर्वांचे सहकार्य व सहभाग आवश्यक आहे़ स्वच्छतेमुळे पंढरपूरच्या लौकिकात भरच पडणार आहे़- सचिन ढोले,कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती