राज्यातील निराश्रित लोकांना कायमचा आश्रय व्हावा, या उद्देशाने दरवर्षी प्रधानमंत्री, रमाई, शबरी अशा विविध योजनेतून घरकुलाचे उद्दिष्टे येते. ते घरकुल वेळेवर बांधून पूर्ण करणे बंधनकारक असते. त्यापैकी बरेच लाभार्थी पहिल्या टप्प्याची रक्कम उचलतात, काही जण दुसऱ्या टप्प्यात येऊन अडकतात. शेवटी ५० टक्केपर्यंतच लाभार्थी बांधून पूर्ण करतात. प्रलंबित लोकांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सतत पाठपुराआ करावा लागतो.
कोट ::::::::::::
शासनाकडून अक्कलकोट पंचायत समितीमार्फत मागील चार वर्षात साडेतीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी १ हजार ८८६ लाभार्थ्यांनी करार करून प्रत्यक्षात बांधण्यास सुरुवात केली. विविध कारणाने आकडा कमी होऊन १ हजार ५२६ जणांनी जवळपास पूर्ण केले आहे. शासनाकडून मिळत असलेला घरकुलाचा लाभ घ्यावा.
- सिद्धय्या मठ,
घरकुल विभाग प्रमुख, अक्कलकोट
वर्षनिहाय उद्दिष्ट व बांधून पूर्ण
२०१६-१७ मध्ये तालुक्यासाठी ८८१ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्याचा लाभार्थ्यांनी पूर्णपणे लाभ घेतला. १७-१८ मध्ये ५१६ चे उद्दिष्ट असताना ५१५ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. १८-१९ मध्ये १३० चे उद्दिष्ट होते. त्याचा लाभ १२८ लोकांनी घेतला आहे. १९-२० मध्ये ४७४ चे उद्दिष्ट होते, त्यापैकी ४६६ मंजूर झाले. त्यापैकी प्रत्यक्षात ३५३ लोकांनी लाभ घेतलेला आहे. यंदाच्या चालू वर्षी २०२०-२१ साठी १ हजार ३४२ घरकुलाचे उद्दिष्ट्य आले असून आतापर्यंत ६०७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून, उर्वरित कार्यवाही सुरू आहे. मंजूर लाभार्थ्यांना घरकुलासाठी पंचायत समितीकडून आदेशपत्र दिले नाही. आता ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता अडचण होत आहे.