याबाबत संतोष दादू करे यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी राजू आगतराव मेटकरी, पांडुरंग बाळू मेटकरी, विजय दिगंबर मेटकरी, वीराप्पा दिगंबर मेटकरी, श्रीनिवास मधुकर करे व लक्ष्मण ज्ञानू मेटकरी (रा. घेरडी-मेटकरवाडी, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा नोंदला आहे.
संतोष दादू करे हा गुरुवारच्या रात्री ११ च्या सुमारास इस्त्रीचे कपडे घेऊन (एमएच ४५/ वाय ९७१३) दुचाकीवरून घराकडे निघाला होता. मेटकरवाडी कॉर्नरवरील उदय डोंगरे यांच्या शेताजवळ राजू मेटकरी व पांडुरंग मेटकरी या दोघांनी त्यांची दुचाकी करे यांच्या दुचाकीला आडवी लावून ‘तू ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना पैसेवाटप करतोस काय?’ अशी विचारणा केली. यावेळी संतोषने मी माझ्या घरी चाललोय असे सांगितले.
यावेळी राजू मेटकरी याने विजय मेटकरी यास फोन करून तेथे बोलावून घेतले. त्याच्यासोबत वीराप्पा मेटकरी हाही होता. या सर्वांनी संतोषला डोक्यात लोखंडी चेनने मारहाण करून जखमी केले. त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना श्रीनिवास करे व लक्ष्मण मेटकरी यांनीही मारहाण केली. यावेळी सुरेश बुचुकले व सिद्धेश्वर वाघमोडे यांनी भांडण सोडवण्ळाचा प्रयत्न केला. सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.