फिर्यादी धनाजी रेवणसिद्ध सरवदे (रा. मुढवी) यांना पीककर्ज काढावयाचे असल्याने ते मंगळवेढ्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते. पीककर्ज काढण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी सोसायटीचा येणे बाकी नसल्याचा दाखला आणण्यास सांगितला. यानंतर १ जुलै रोजी भ्रमणध्वनीवरून सेक्रेटरी यास दाखल देण्यासाठी विनंती केली. यावेळी शंभर रुपये द्यावे लागतील असे ते म्हणाले. यावेळी फिर्यादींनी पैसे कशासाठी असे विचारले असता मला दारू पिण्यासाठी पैसे लागतात, असे सांगितले. यावर फिर्यादीने पैसे देतो तुम्ही मला पावती द्या असे म्हणाले. दरम्यान ७ जुलै रोजी दुपारी पंचायत समिती आवारात सेक्रेटरीने फिर्यादीची जात विचारल्यावर फिर्यादीने मी महार जातीचा आहे, असे म्हणताच सेक्रेटरीने शिव्या देऊन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिल्याचे सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सोसायटीचा दाखला मागितल्यावरून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:16 AM