शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:13 PM

सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली; सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो

ठळक मुद्देगिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख होती, तेव्हापासून आतापर्यंतच्या सावकारी प्रथेची माहिती शहरातील लोकांना आहेएक हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सावकाराकडून महिन्याकाठी ५ टक्के, दहा टक्के, १५ टक्के,२० टक्के दराने कर्ज घेतात ज्या दिवशी कर्ज घेतले जाते तेव्हापासून पुढील महिन्यातील तारखेला न चुकता ठरलेले व्याज सावकारांना द्यावे लागते

सोलापूर : शहरातील सर्वसामान्य कष्टकरी लोक, व्यापारी, नोकरदार, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक इतकेच काय तर सराफांनाही व्याजाने पैसे देतात. समोरच्या व्यक्तीची कुवत पाहून सावकार मंडळी कर्ज देतात. वेळ पडली तर एका दिवसात एक कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम देणारीे सावकार मंडळी सोलापुरात असून, कर्जदारांना महिन्याकाठी दोन टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याज लावले जाते. 

गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख होती, तेव्हापासून आतापर्यंतच्या सावकारी प्रथेची माहिती शहरातील लोकांना आहे. हातावर पोट असणारे लोक दैनंदिन गरजा, धार्मिक कार्य, साखरपुडा, लग्नकार्य आधी कार्यक्रमासाठी नाईलाजास्तव सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. एक हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सावकाराकडून महिन्याकाठी ५ टक्के, दहा टक्के, १५ टक्के,२० टक्के दराने कर्ज घेतात. ज्या दिवशी कर्ज घेतले जाते तेव्हापासून पुढील महिन्यातील तारखेला न चुकता ठरलेले व्याज सावकारांना द्यावे लागते. व्याजाची रक्कम चुकली की त्यावर व्याजाला व्याज लावलं जातं. कर्ज घेतलेली व्यक्ती एका सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो. असं करत करत कर्ज घेतलेले लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ संपत्ती विकून सावकारांची देणी फेडतात. सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली आहेत. अनेकांचे संसार सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे उद्ध्वस्त झाले आहेत.

एक ते पाच वर्षांपर्यंत होऊ शकतो कारावास- सावकाराने जर कोरे धनादेश (चेक), कोरा बॉण्ड किंवा अन्य कागदपत्रे घेतल्यास कलम ४२ प्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड किंवा तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. - मनी लँडिंगचा परवाना असेल तर सावकारांना वर्षाकाठी विनातारण १८ टक्के, तारण ठेवल्यास १५ टक्के दराने व्याज घेता येते. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कलम ४४ अन्वये पन्नास हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.- मनी लँडिंगचा परवाना नसताना सावकारी करणाºया व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.- कर्जदाराला त्रास दिल्यास संबंधित सावकाराला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा लागू शकते.  

तक्रारदार ठाम राहिल्यास शिक्षा नक्की : अ‍ॅड. संतोष न्हावकरएखाद्या व्यक्तीने धाडस करून खासगी सावकाराविरुद्ध जर फिर्याद दिली तर ती पुढे प्रभावीपणे टिकत नाही. सावकार हा राजकीय वरदहस्ताखाली असतो, शिवाय त्याच्या सर्वत्र ओळखी असतात. सर्वसामान्य माणसाला केवळ फिर्याद देऊन त्याच्याशी लढा देता येत नाही. खटला पुढे-मागे जाऊन तडजोडीने मिटवला जातो. फिर्याद देणारी व्यक्ती जर आपल्या तक्रारीवर ठाम राहिली तर सावकाराला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती संतोष न्हावकर यांनी दिली.२० हजारांचे झाले बारा लाख...सोलापुरातील एका व्यक्तीने खासगी सावकाराकडून दहा टक्के व्याजाने वीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वीस हजार रुपयांच्या कर्जाला सावकाराने व्याजाला व्याज लावत बारा लाख रुपयांची रक्कम केली आणि त्यासाठी तर रोज तगादा लावला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजी