उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावे पुनर्वसित झाली आहेत. या गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. करमाळा तालुक्यासाठी या निधीमधून एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये उंदरगाव येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करणे यासाठी २६ लाख १४ हजार ५५० रुपये, वांगी नंबर २ येथील रस्त्याचे अंतर्गत खडीकरण करण्यासाठी १६ लाख २३ हजार ५३८ रुपये, वांगी नंबर चार येथील रस्त्याच्या अंतर्गत खडीकरणासाठी १८ लाख २ हजार रुपये, तसेच स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी १२ लाख ४८ हजार ६२४ रुपये, रिटेवाडी येथील स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी १९ लाख ४४ हजार रुपये व वांगी नंबर ३ येथील स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी ५ लाख रुपये असा एकूण ९७ लाख २२ हजार ७१२ रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. लवकरच ही कामे पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
----