सोलापूर : पंप दुरूस्ती व महावितरणच्या कामामुळे संपूर्ण शहरात एक दिवस पाणीपुरवठा पुढे जाई अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.
सोलापूर महानगरपालिकेच्या सोरेगाव पंप हाऊस मधील महावितरणाची लाईन खराब झाल्यामुळे टाकळी येथील पंप बंद करण्यात आले होते. सदर महावितरणचे काम आज दुपारी तीन वाजता करण्यात आले असून तत्पूर्वी टाकळी येथील वैष्णवी पेट्रोल पंपच्या शेजारी मेन सोलापूरला येणारी पाईपलाईन खालील भागात तीन ठिकाणी फुटल्याने पाणी सर्व तिथेच जात होते. त्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम आज मा आयुक्त यांच्या आदेशाने करण्यात आले.
दरम्यान, सदर पाईप संपूर्ण कुजल्याने त्या ठिकाणी रिपेअरचे काम गुरूवारी दुपारी दीड वाजेपर्यंत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आले. त्यामुळे सोलापूर शहरात होणाऱ्या पाणीपुरवठा १ दिवसात उशिरा होणार असून नागरिकांनी मनपा सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. तसेच आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी टाकळी पंप हाऊस तसेच टाकळी येथिल सोलर सिस्टीम आणि ज्या ठिकाणी पाइपलाइन फुटली आहे. त्या ठिकाणी पाहणी केली.आणि त्याठिकाणी कुजलेल्या पाईप त्वरित बदलावे असे आदेश आयुक्त यांनी दिले.