शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवर ‘वन एन्ट्री...वन एक्झिट’ गेट

By appasaheb.patil | Published: October 20, 2020 11:33 AM

‘आरपीएफ’पोलिसांची संकल्पना; प्रवाशांकडून कोरोना रोखण्यासाठी केल्या उपाययोजना

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेतमास्क वापरणे, सॅनिटायझर बाळगणे याशिवाय आरोग्य विभागाने दिलेल्या विविध सुचनांचे पोस्टर स्थानकावर झळकाविण्यात आलेकोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे पालन करण्यासाठी स्थानकावर ५० आरपीएफ जवान तैनात

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘आरपीएफ’ (रेल्वे सुरक्षा बल) च्या टीमने सोलापूर रेल्वे स्थानकावर लाल कलरमध्ये चैनची बॅरिगेटींग करून ‘वन एन्ट्री...वन एक्झिट’ संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख श्रेयस चिंचवाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले़ लॉकडाऊनमुळे रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या, तब्बल ६ महिन्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून हळूहळू रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत़ आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत रेल्वेने प्रवाशांपासून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत़ रेल्वेने प्रवास करणारे व परजिल्हा किंवा परराज्यातून आलेल्या लोकांसाठी वेगळा मार्ग करण्यात येत आहे़ शिवाय प्रवाशांना उभारण्यासाठी स्थानक, तिकीट खिडकी, रेल्वे गेट यासह अन्य स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी हजारो मार्किंग आरपीएफने केल्या आहेत़ कोणत्याही प्रवाशांपासून कोरोनाचा संसर्ग होणार याची पूर्णपणे जबाबदारी रेल्वेच्या सुरक्षा बलाने घेतली आहे.------------प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ५० जवान तैनात...फिजिकल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ शिवाय प्रवाशांनी रेल्वे प्रवासावेळी मास्क वापरणे, सॅनिटायझर बाळगणे याशिवाय आरोग्य विभागाने दिलेल्या विविध सुचनांचे पोस्टर स्थानकावर झळकाविण्यात आले आहेत़ कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे पालन करण्यासाठी स्थानकावर ५० आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत़ राज्याराज्यातील प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात़ कोणत्याही प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आरपीएफ पोलिसांकडून खबरदारी व उपाययोजना आखण्यात येत आहेत़ सोलापूर रेल्वे स्थानकावर नव्याने  ‘वन एन्ट्री़़़वन एक्झिट’ गेट तयार करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलास सहकार्य करावे़- श्रेयस चिंचवाडे,सुरक्षा आयुक्त ,आरपीएफ, सोलापूर विभाग 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या