शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शिक्षण प्रसारक मंडळ दहावीचा निकाल शंभर टक्के.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:15 AM

माध्यमिक शालांत परीक्षा पुणे विभागाचा कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण ३०४७ विद्यार्थ्यांपैकी १२४७ विद्यार्थी विशेष श्रेणी, १३१५ ...

माध्यमिक शालांत परीक्षा पुणे विभागाचा कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण ३०४७ विद्यार्थ्यांपैकी १२४७ विद्यार्थी विशेष श्रेणी, १३१५ प्रथम श्रेणी, ४५२ द्वितीय श्रेणी, तर ३३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेत शिवचंद्र थोरात व श्रेयस शिंदे यांनी १०० टक्के (सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज) गुण मिळवून प्रथम आले. आकाश जगताप (स.मा.वि. अकलूज), प्रियंका शिंदे (जिजामाता कन्या प्रशाला), हर्षाली नाईकनवरे (लक्ष्मीबाई कन्या प्रशाला) यांनी ९९.२० टक्के द्वितीय, इकरा शेख (जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज) ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला (यशवंतनगर), श्री बाणलिंग विद्यालय (फोंडशिरस), कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील विद्यालय (सदाशिवनगर), मोरजाई विद्यालय (मोरोची), सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील विद्यालय (वेळापूर), श्री गणेश विद्यालय (पिंपळनेर), श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय (वाघोली), श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय (कोळेगाव), सदाशिवराव माने विद्यालय (माणकी), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय (कोथरुड), श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय (संग्रामनगर), श्री समर्थ रामदास विद्यालय (शिवथर), प्रतापसिंह मोहिते-पाटील विद्यालय (शिवपुरी), श्री पळसेश्वर विद्यालय (पळसमंडळ), श्री काळभैरव विद्यालय (गुरसाळे), श्री सावतामाळी विद्यालय (माळेवाडी), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील प्रशाला (नातेपुते), श्री हनुमान विद्यालय (लवंग), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय (मांडवे), श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालय (चाकोरे), श्री तुकाराम विद्यालय (बोंडले), श्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय (विझोरी), श्री शंभू महादेव विद्यालय (उंबरे- दहिगांव), श्रीनाथ विद्यालय लोंढे (मोहितेवाडी), रामलिंग विद्यालय (कुरबावी), कृष्णानंद विद्यामंदिर (पाटीलवस्ती), अकलाई विद्यालय (अकलूज), श्री संभाजीबाबा विद्यालय (इस्लामपूर), मोहनराव पाटील विद्यालय (बोरगाव), रात्र प्रशाला (अकलूज) या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सदस्य संग्रामसिंह मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील यांच्यासह संचालक, विविध शाखांचे पदाधिकारी, मुख्याध्यापकांनी कौतुक केले.