पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलीचे आई व वडील शेतात गेले होते. त्यावेळी मुलगी घरात एकटीच होती. पाच वाजेच्या सुमारास ते दोघे घरी आले असता, मुलगी घरी नसल्याचे दिसून आले. मुलीच्या आई व वडिलांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर महेश नारायण पनासे (रा. वेळापूर, ता. माळशिरस) मुलीला त्रास देत असल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्या मुलीचे दुसरीकडे लग्न होण्याआधी पळवून आणून लग्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे महेशच्या घरचे त्याला म्हणत असल्याचे समजले.
पीडित मुलीला पळवून नेण्यासाठी महेश पनासे याला अभिजित कोंडिबा जाधव, संदीप रामचंद्र जाधव, जीवन पताळे (सर्व रा. खंडाळी, तालुका माळशिरस) यांनी मदत केली असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने केली आहे. महेश व त्याच्या मित्रांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. महेश पनासे यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस प्रशासनास कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.