दगडू तुकाराम कोळेकर (वय ४२, रा. कोळा-कराडवाडी) असे मयताचे नाव आहे, तर मायाप्पा शिवाजी आलदर (रा. कोळा-कराडवाडी ता. सांगोला) असे गंभीर जखमींची नावे आहे.
याबाबत समाधान आलदर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी विजय बुधू पासवान (रा. बैधनातूर-करनौल निलकंठ, जि. मुजफ्फरपूर,बिहार) या परप्रांतीय क्रेनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मायाप्पा आलदर, नाना आलदर, दगडू कोळेकर हे दुचाकीवरून निघाले असता रात्री १०.४५ च्या सुमारास गोविंद कोळेकर वस्तीच्या पुढे (एमएच १६/एफ ८२४९) हैदराबाद कंपनीच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेनने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. मायाप्पा आलदर हा ५ ते ६ फूट फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाले. तेथून थोड्या अंतरावर बसलेले दगडू कोळेकर यांनाही याच क्रेनने धडक दिल्याने जखमी होऊन बेशुद्ध पडले. समाधान आलदर यांनी रुग्णवाहिकेतून दोघांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दगडू कोळेकर मयत झाल्याचे सांगितले, तर मायाप्पा आलदर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.