राजू माने हे सकाळी कामावर जाताना रामचंद्र पोरे यांच्या घराजवळ आले असता पंढरपूरकडून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस (क्र. एम. एच.१३/५९९२) ने मागून धडक दिली आणि बस भरधाव निघून गेली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या माने यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक दिल्यानंतर उडालेली मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या श्रावणी मच्छिंद्र पोरे (वय ७) या मुलीच्या अंगावरून उडून गेली. यामध्ये मुलीच्या डोक्याला मार लागून ती सुद्धा जखमी झाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. राजू माने यांना त्यांच्या पत्नीने आज कामावर जाऊ नका, असा सकाळी आग्रह धरला होता. तरीही राजू माने कामावर जाण्यासाठी निघाले होते आणि अपघात झाला. अपघातस्थळी आलेल्या नातेवाइकांनी आक्रोश केला.
चालकावर कारवाई करणार
एसटी बस दुचाकीस्वाराला धडक देऊन निघून गेल्याचे पाहताच नागरिकांनी ग्रामीण पोलीस व पंढरपूर बस आगारात कळवले. त्यानंतर पंढरपूर बस आगार व्यवस्थापनाने संपर्क साधून सदर बस फलटण बसस्थानकातून पंढरपूरला परत बोलावली आहे. पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार चालक दोषी असेल तर कारवाई होईल अशी माहिती आगार व्यवस्थापक सुतार यांनी दिली.