१ सप्टेंबर रोजी तहसीलदारांच्या भरारी पथकाने पाठलाग करून सांगोला-सोनंद रोडवर अवैध वाळू वाहतूक करीत असताना सुरेश काशीद (सोनंद) व रामा आगलावे (आगलावेवाडी) यांच्या मालकीचे १० लाखांचे दोन विना नंबरचे ४०७ टेम्पो पकडून ७१ हजार रुपयांची २ ब्रास वाळू, मेडशिंगी रोड बेले बंधारा येथे पाठलाग करून सांगोला-खारवटवाडी येथील बापू लेंडवे यांच्या मालकीचा सुमारे ५ लाखांचा एमएच ०९/ क्यु ५२४५ टेम्पोतून ३५ हजार ५५० रुपयांची १ ब्रास वाळू असा सुमारे १६ लाख ६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित टेम्पो मालकांना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे तीन लाख रुपयांच्या दंडात्मक नोटीस बजावल्या आहेत.
कोट :::::::::::::
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समितीत सरपंच अध्यक्ष असून, इतर प्रशासकीय कर्मचारी सदस्य आहेत. ग्रामस्तरीय समितीने गावामध्ये होणारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवून जे कोणी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करतील, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- अभिजित पाटील
तहसीलदार, सांगोला