याबाबत एकावर गुन्हा नोंद झाला आहे.
मच्छिंद्र विश्वनाथ मुकटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गावातील झेडपी शाळेसमोरील रोडवर चौकात रात्री ७ वाजण्याच्या सुमारास थांबलो होतो. तेव्हा धनाजी हा माझ्याकडे आला. त्याच्या उजव्या हातात चाकू होता. तो माझ्याजवळ येऊन तू आमच्या घरामध्ये मी दारू पितो, असे सांगून भांडण लावतोस काय, तुला मस्ती आली आहे, असे म्हणत शिवीगाळ करून चाकूने हल्ला केला. तेव्हा मी मोठ्याने ओरडलो. तिथे माझा भाऊ बापूसाहेब मुकटे हा पळत येताना दिसताच, तो तिथून पळून गेला. मी जखमी अवस्थेत असलेले पाहून पोपट कुरडे, प्रमोद मुकटे, अर्जुन मुकटे यांनी उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केले. याबाबत मी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात धनाजी महादेव शिरसाट याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश डोंगरे हे करीत आहेत.