भालके समर्थक म्हणून ओळखले जाणारे पं. स. सदस्य रमेश भांजे यांचा राजकीय वरदहस्तदेखील या भागात प्रभावी मानला जातो. अरळी येथे ११ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत भांजे गटाच्या शारदाबाई भैरगोंडे यांच्या रूपाने एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे दहा जागांसाठी चुरसीने निवडणूक झाली. यात भांजे गटाला आ. परिचारक व आवताडे समर्थकांनी मोठी टक्कर दिली. दोन्ही गटांना प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. परंतु, भांजे गटाला सत्तेसाठी आवश्यक सहा जागा मिळाल्या. यामध्ये भांजे गटाच्या उषा भांजे या प्रभाग २ मधील उमेदवारास एकूण २१५ मते मिळून त्या विजयी झाल्या, तर त्यांच्या विरोधी गटातील उमेदवाराला २१४ मते मिळाली. केवळ एका मतामुळे त्या विजयी झाल्याने भांजे गटालाही केवळ एका मतामुळे सत्तेची संधी मिळणार आहे.
अरळीत एका मताने भांजे गटाला मिळाली सत्तेत बसण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:21 AM