आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा चोरी होते, व्यापारी काटा मारतात त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते़ याविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास बाजार समितीतील शेतकºयांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले़ या घटनेनंतर बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे व प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकºयांची भेट घेऊन म्हणणे ऐकून घेतले़ यावेळी कांदा चोरी करणाºया हमाल, तोलार आणि एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासक कुंदन भोळे यांनी दिली़ कांदा चोरीबाबत कडक उपाययोजना करून चोरी रोखण्यात लवकरच यश मिळवू, अचानक बंद करणाºया व्यापाºयांना समज देऊन कारवाई करणाऱ शिवाय महिला कामागारांना आयकार्ड करण्याचे प्रयत्न करून चोरी आळा आणू़ सफरचंद चोरीला जात नाही, डाळिंब चोरीला जात नाही मग कांदाच कसा चोरीला जातो असेही प्रशासक भोळे यांनी संबंधितांना विचारले़ दोन तासांच्या आंदोलनानंतर शेतकºयांनी कांदा लिलाव सुरू केले़ या आंदोलनामुळे बाजार समितीचे कामकाज बंद पडले होते़ काही काळ पोलीस बंदोबस्तात लिलाव सुरू करण्यात आला़
कांदा चोरी व व्यापाºयांच्या विरोधात शेतकºयांनी कांदा लिलाव पाडला बंद, सोलापूर बाजार समितीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:33 PM
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा चोरी होते, व्यापारी काटा मारतात त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते़ याविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास बाजार समितीतील शेतकºयांनी कांद्याचे लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केले़
ठळक मुद्देशेतकरी व व्यापाºयांत झाला वादबाजार समितीतील मार्केट वाढविण्याचे काम सुरू : कुंदन भोळेपूर्वीपेक्षा ४० टक्के कांदा चोरी कमी झाली : विनोद पाटील