सोलापूर : एटीकेटी व अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी सोलापूर विद्यार्थी काँग्रेस एनएसयुएचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात निवेदन देण्यास गेल्यावर निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने विद्यापीठ परीक्षा नियंत्रक यांच्या केबिनला टाळे ठोकले. मंगळवारी ५ वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान विद्यापीठाने सहा सात आणि आठ ऑक्टोंबर दरम्यान होणाºया परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे़ याबाबत विद्यापीठाने पत्र काढले आहे.