आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांसाठी २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी केंदे्र सुरू करण्यात आली असून, शेतकºयांनी हमीभाव केंद्रांवर धान्य विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करावयाची आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरच माल हमीभाव केंद्रावर खरेदी केला जाणार आहे. कुर्डूवाडी केंद्रावर ११५१, दुधनी केंद्रावर ५२, बार्शी केंद्रावर ८४१, सोलापूर केंद्रावर ४५ तर अक्कलकोट केंद्रावर १८ अशा २१०७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात उडीद, मूग व सोयाबीनच्या खरेदीसाठी कुर्डूवाडी व दुधनीचे हमीभाव केंद्र यापूर्वी सुरू केले असून बार्शीचे हमीभाव केंद्र गुरुवारी सुरू केले आहे. सोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ---------------तर हमीभावाची प्रतीक्षाच आर्द्रता(ओलावा) व स्वच्छ मालाच्या जाचक नियमामुळे शेतकºयांचे धान्य सध्या कमी किमतीने बाजार समित्यामध्ये विक्री केले जात आहे. आॅनलाईन नोंदणी केली तरी प्रत्यक्षात धान्य विक्रीसाठी जाण्यासाठी मालाच्या प्रतवारीच्या तपासणीत धान्य नाकारले जाते. यामुळे शेतकरी भाव कमी का?, मिळेना व्यापाºयाच्या हवाली करुन रिकामा होत आहे. -----------------शेतकºयांनी मूग, उडीद व सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करावी. स्वच्छ धान्य नाकारले जाणार नाही. उडिदासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ४०० रुपये, मुगासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये व सोयाबीनसाठी तीन हजार ५० रुपये दर दिला जाणार आहे.-अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर ---------------------एसएमएस जाणार..- आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.- खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या विशेष (एफएक्यु)प्रतिचा माल आणावा.- धान्य वाळवून व चाळणी करुन तसेच धान्याची १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता(ओलावा) असावी.- शेतकºयांना खरेदीचा दिनांक व वेळ मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रे, २१०७ शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 6:01 PM
जिल्ह्यातील कुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली असून, पुढील आठवड्यात सोलापूर व अक्कलकोट येथे केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे.
ठळक मुद्देकुर्डूवाडी, दुधनी व बार्शी येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्रेसोलापूर व अक्कलकोटचे केंद्र पुढील आठवड्यात आॅनलाईन नोंदणीसाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.