स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनीही यात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन प्रा. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायलॉजी सोसायटी, इंडिया यांच्या हस्ते झाले. त्यांनी कोरोनावर माहितीपर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एच.एस.पाटील होते.
या स्पर्धेत प्रथम स्नेहा नलवडे, द्वितीय स्वेता जाधव, तृतीय भूमिती माने व विशाखा शिराळकर या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सत्कार करण्यात आला. यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्षा वर्षा झाडबुके यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन एसबीझेडएम, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख अरुषा नंदीमठ यांनी केले होते. डॉ. नमिता डोईफोडे आणि प्रवीण मस्तुद यांनी सहकार्य केले.
----