मागील १०-१२ वर्षांत सतत शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू असते. यामुळे बहुतेक ठरावीक शेतकरी कर्ज भरत नाहीत. बरेच शेतकरी कर्जमाफीची वाट पाहून कर्ज भरतात. मात्र, सरकार नंतर कर्जमाफीची घोषणा करते. त्यात प्रामाणिकपणे कर्ज भरणा-यांना फायदा न होता थकविणाऱ्यालाच माफी मिळते. अलीकडे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे थकबाकीत जाणा-या विकास सोसायट्यांची संख्या वरचेवर वाढत आहे.
तालुक्यात ६७ विकास सोसायट्या असल्या तरी त्यापैकी १८ संस्थांचे चालू बाकीदार संचालक किंवा चेअरमन यापैकी ज्यांच्या नावाचा ठराव होईल, त्या एकाला मतदानाचा अधिकार मिळणार आहे. कारण, या १८ संस्थांची बँक पातळीवर १०० टक्के वसुली आहे.
उर्वरित ४९ विकास सोसायट्यांचे संचालक व चेअरमन यांना मतदानासाठी स्वतःच्या नावाने ठराव करता येत नाहीत. शिवाय, निवडणूकही लढविता येत नाही. कारण, या संस्था बँकपातळीवर थकीत आहेत. मात्र, शेतकरी सभासदांपैकी थकबाकी नसलेल्या शेतक-यांच्या नावाचा ठराव करता येतो.
---
या आहेत त्या १८ सोसायट्या
मार्डी, खेड, बाळे, गुळवंची, हगलुर, दहिटणे, डोणगाव, तेलगाव, हिरज, तिर्हे,
नान्नज-१, कळमण-२, होनसळ-१, डोणगाव-१, नंदूर-१, हिरज-१, शिवणी-१, गुळवंची-१. ६७ पैकी पाथरी विकास सोसायटीला प्रशासक आहे.
0 तालुक्याच्या ग्रामीण भागात ५२ तर सोलापूर शहरात १५ विकास सोसायट्या आहेत.
----