इयत्ता ८ वी ते १२ वी या गटातील शाळा सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार मागील महिन्यापासून कोरोना बाधित रुग्ण आढळून न आलेल्या गावातील शाळा सुरू करण्याबाबत आदेश आहेत. त्यासाठी लागणारे कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केलेल्या ग्रामीण भागात केवळ ३२ जिल्हा परिषद शाळा आहेत. तेवढ्याच शाळा सोमवार, १२ जुलैपासून सुरू होणार आहेत. शहरातील शाळा सुरू होण्यासाठी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आणखीन दोन दिवस लागणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली आहे. वर्गावर कोरोनापासून सुरक्षितता बाळगण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य खरेदी करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
---
एका डेस्कवर एकच विद्यार्थी
सलग एक महिन्यापासून त्या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसावा. स्थानिक समिती सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख समितीने कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केलेली असावी. पटसंख्या अधिक असेल, तर एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलावणे, एका डेस्कवर एकाच विद्यार्थी बसेल, मास्क, सॅनिटायजर, शारीरिक अंतर या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सक्ती केली जाणार नाही.
----
अक्कलकोट शहरातील शाळा सुरू होण्यासाठी आणखीन दोन दिवस लागतील. मात्र ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी, नियमांचे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणारी नाही. पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
- अशोक भांजे, गटशिक्षणाधिकारी, अक्कलकोट
---
११ तोळणूर
अक्कलकोट तालुक्यात तोळणूर येथे उर्दू शाळेत रविवारी वर्ग सॅनिटाईज करून घेण्यात आले.
११ अक्कलकोट
शाळा सुरू करण्यापूर्वी अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे.