टेंभुर्णी / भीमानगर : माढा तालुक्यातील शिराळ येथील एका बेकरी व्यावसायिकाचा अत्यंत क्रूरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या खून प्रकरणाने माढ्यात खळबळ उडाली असून मारेकºयांना शोधणे हे पोलिसांपुढे आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे.
संजय मारुती काळे (वय ५४, रा. शिराळ, ता. माढा) असे खून झालेल्या बेकरी व्यावसायिकाचे नाव आहे़ टेंभुर्णी-अकलूज रोडवर शेवरे परिसरात उजनीच्या डाव्या उजवा-कालव्याच्या साईटपट्टीला रविवारी सकाळी हे खून प्रकरण उघडकीस आले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मृत संजय हे बेकरीचा पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते शनिवारी सायंकाळी जेवण आटोपून घराबाहेर अंगणात झोपी गेले. शनिवार सकाळी ते पत्नीला निदर्शनास आले नाहीत़ त्यांचा छोटा हत्ती टेम्पो आणि मोबाईल जागेवर नव्हता़ कॉल केला असता मोबाईलही बंद लागला़ पत्नीने सर्वत्र शोध घेतला़ मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान स्वत:च्या छोटा हत्ती (एम़ एच़ ४५-६५७७ ) मालवाहतूक वाहन घेऊन घराबाहेर पडले असल्याचा घरच्या लोकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी सात वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याच्या उजव्या बाजूच्या रस्त्यालगत टेंभुर्णी-अकलूज रस्त्यापासून आतमध्ये जवळपास ६०० फूट अंतरावर शेवरे परिसरात काही पादचाºयांना छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. जवळ जाऊन डोकावले असता अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला़ छातीपासून थोडा वरचा भाग, डोके व एक हात शाबूत होता. बाकी शरीर खालून पूर्णत: जळून खाक झाले होते. मारेकºयांनी चेहºयावर धारदार शस्त्राने वार केलेल्या खुणा आढळून आल्या.
या ठिकाणी टेम्पो ही पलटी झालेला होता. दरम्यान, मारेकºयांनी त्यास ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकू न मृतदेह पेटवून दिला़ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ मृतदेह ताब्यात घेऊन तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केला. घटनास्थळी शिराळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती.