तहसीलदारांनी तात्काळ दखल घेऊन सुविधा निर्माण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.
येथील कोविड सेंटरमध्ये जवळपास ७० ते ८० रुग्ण असून, येथे एकच शौचालय आहे. त्यामुळे अनेकांना प्रातर्विधीसाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अडचणी येत आहेत. १२ मार्चपासून येथे पाणीच आलेले नाही. त्यामुळे शौचालयात जाणे, आंघोळ करणे, पिण्याला पाणी अशा गैरसोयीने रुग्ण त्रस्त आहेत.
----
करमाळा येथील कोविड सेंटरमध्ये महिला व पुरुष रुग्ण आहेत. रुग्णांच्या तक्रारीची दखल कोणीही घेत नाही. पाणीच नसेल तर नेमके करायचे काय? एकच शौचालय, त्याची दुरवस्था आहे. इतर अत्यावश्यक सुविधांचाही अभाव आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी स्वत: दखल घेऊन तात्काळ सुविधा पुरवाव्यात.
- राजाभाऊ घळके, देवळाली