शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोरोनानंतर देशांतर्गत पर्यटनाला संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 3:38 PM

कोरोनाची भीती जाताच लोकांनी पर्यटनासाठी भारतातच पसंती दिल्यास आपल्याच देशाच्या संस्कृतीचा आनंद घेत कोरोनामुळे मनावर आलेलं हे दडपण दूर होण्यास मदतच होईल.

सन्माननीय अन् मित्रहो कोरोना विषाणूमुळं अवघं जग धास्तावलंय. अनेक जण मृत्यूशी झुंजताहेत. दोनशेहून अधिक देशात कोरोनानं उच्छाद मांडलाय. अनेकांना त्यानं मृत्यूच्या जाळ्यात ओढलंय आणि ओढतोय. यात आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात भेडसावू लागलं आहे. त्यात मजुरांचे स्थलांतर, बाजारपेठही बंद आहे, कच्चामाल मिळत नाही, वाहतूक सेवा बंद आहेत. देश, राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने अनेक उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. यातून पर्यटन क्षेत्रही सुटलेलं नाही. करोडो रुपयांचे नुकसान सहन करणाºया पर्यटन क्षेत्रासाठी भविष्यात जीवनदायी ठरेल ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव व भीती कमी झाल्यावर देशांतर्गत पर्यटनाला सुवर्णसंधी येऊ शकते. सर्वच देशात कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. भारतात याचे प्रमाण कमी असल्याने देशांतर्गत पर्यटनाला सुगीचे दिवस येतील, असे वाटते. सध्याच्या स्थितीमध्ये सर्व जग या विषाणूमुळे थांबले आहे. अशा परिस्थितीत मनातील भीती परदेशी जाऊ नये हेच मनात घोंगावत आहे. पर्यटक सर्व जग फिरतात, परंतु आज याला ब्रेक लागला आहे. परंतु कोरोनाची भीती जाताच लोकांनी पर्यटनासाठी भारतातच पसंती दिल्यास आपल्याच देशाच्या संस्कृतीचा आनंद घेत कोरोनामुळे मनावर आलेलं हे दडपण दूर होण्यास मदतच होईल, असं वाटतं. अर्थात पूर्वीपेक्षा अधिक दक्षता घेत हे करावं लागणार हे मात्र निश्चित. 

भारतीय संस्कृती नेहमीच ‘अतिथी देवो भव’ या तत्त्वावर अनेक लोकांना सेवा देते. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय आज जरी बंद असला तरी पुढे नक्कीच पर्यटनामुळे चांगले दिवस असणार आहेत. पर्यटनाला भारत देशातील संस्कृती अनुभवाला मिळेल. कामगारांचे स्थलांतर होत असताना या पर्यटन क्षेत्रात मोठी किंमत चुकवावी लागत असताना व्यवस्थापनाकडे कामगार मिळावे हे सुद्धा सोपे होईल. प्रत्येकाला काम करावे लागेल. घरचा रथ ओढण्यासाठी प्रत्येक भारतीयाला काम करावे लागेल. अशा परिस्थितीत रोजगार निर्मितीही पर्यटनक्षेत्र करून देईल व मोठ्या प्रमाणात लोक हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करतील.

टूर अँड ट्रॅव्हल सेवा देणारी कंपनी भारतात जास्त टूर करतील, जेणेकरून स्थानिक पातळीवर सर्व क्षेत्र व त्यावर अवलंबून असणारे उद्योग यांना चालना मिळेल. पर्यटक स्थानिक ठिकाणी राहणे, जेवणे किंवा स्थानिकांकडून खरेदी करणे हे करताना दिसून येतील. त्यामुळे नक्कीच देशाचे, राज्याचे व स्थानिक क्षेत्राचे विकास होणे शक्य आहे, असे वाटते.

 आज मनात भीती तर आहेच; पण काही पर्यटक आपल्या पसंतीच्या जागी जसे पर्वतरांगा, नदी, समुद्र, किनारपट्टी, जंगल, थंड हवेची ठिकाणे, तलावांचा अनुभव घेण्यासाठी सदैव उत्सुक असतात आणि आपल्या देशात याची कमतरता नाही. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय संस्कृती बघण्यासाठी नक्कीच पर्यटक भ्रमंती करतील.

आर्थिक स्तरावर जर पर्यटक देशांतर्गत पर्यटन करतील तर भारतातील चलन हे देशातच राहील. विदेशात जाऊन खर्च करताना विदेशाला आपण समृद्ध करतो, परंतु भारतात खर्च झालेला पैसा नक्कीच आर्थिक दुर्बलता कमी करेल. भारतात हे चलन फिरण्यास मदत होईल, असं वाटतं. काळ खराब असला तरी पर्यटन क्षेत्रासमोर त्यातून बाहेर पडण्याची ताकद नक्कीच आहे. हे सर्वतोपरी प्रयत्न आणि संकटातून मार्ग काढण्याची ताकद माणसात आहे. भारतीय लोक संकटातून मार्ग काढण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. केंद्र व राज्य सरकारने काही नियम व अटी शिथिल करून हॉटेल, रेस्टॉरंट व टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांना सहकार्य करावे. विमानसेवा, रेल्वे आणि बससेवा सुरळीत करत सर्वांना पर्यटन स्थळांशी जोडावे. रस्ते नीट करून जास्तीत जास्त स्थळांना जोडावे, जेणेकरून दळणवळण सोपे होईल .

केंद्र व राज्य सरकारकडून करसवलती द्याव्यात. जेणेकरून ग्राहक व मालकांचाही फायदा होईल. चलन फिरावे, सरकारने सुरक्षा व सुविधा यावर लक्ष दिल्यास पर्यटक नक्कीच भारतात पर्यटन करतील आणि या सर्वांचा सुवर्णकाळ परत येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले तर पुन्हा चांगले पर्यटन घडेल, हे नक्की.- ऋत्विज चव्हाण(लेखक सामाजिक व कला क्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स