पंढरपूर : कोरोना साथीच्या धर्तीवर जमाव बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. असे असताना देखील उपजिल्हा रुग्णालय परिसरात निषेध आंदोलन करणाºया ६० लोकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास कोविड १९ रुग्णालय करण्यात येत आहेत. यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत. मात्र याठिकाणी दाट वस्ती व झोपडपट्टी भाग असल्याने या परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयास कोविड १९ रुग्णालय करण्यास विरोध दर्शविला. त्यासाठी त्यांनी निषेध आंदोलन केले.
याप्रकरणी माया दत्तात्रय कोळी (वय ४०), स्वाती युवराज मान (वय ३३), भाग्यश्री सोमनाथ माने (वय २७), ज्योती समीर मगर (वय २५), रोहीणी गणेश कोळी (वय ४०), जया धर्मा तावस्कर (वय ३२), नंदा विलास परचंडे (वय ४०), सुनिता धनंजय माळी (वय ४३), शालन मच्छिंद्र कोळी (वय ६०), आशाबाई हरी रणदिव (वय ५०), निलावती भिकु कडलास्कर (वय ६५), सुजाता विठ्ठल अंकुशराव (वय २७), वैशाली संजय डवरी (वय ४०), संगीता पोपट वाघमारे (वय ४५), मिना जगन्नाथ शिनगार (वय ३७), शोभा आनंद बंगाळे (वय ५०), रेखा अशोक कासार (वय ३०), सविता मोहन माने (वय ४२), बबन धनंजय माळी (वय २५), विकास दत्तात्रय कोळी (वय ३१, सर्व रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), प्रशांत प्रभाकर लोंढे (रा. रामबाग रोड, पंढरपूर) व इतर त्यांचेसोबतचे २७ ते ३२ महिला व ५ ते ७ पुरूष यांचा सहभाग होता.
यामुळे वरील सर्वांवर भा दं वि का क १४३, २६९, १८८ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३)/१३५ तसेच साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २, ३ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.