अक्कलकोटे यांनी प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल ऑडिट १ महाराष्ट्र इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट यांच्याकडे ई-मेलद्वारे बार्शी नगर परिषद, बार्शीच्या कॅग लेखापरीक्षणात खालील मुद्द्याच्या आधारे सखोल तपासणी करून जबाबदारी निश्चित करणे व वसूलपात्र रकमांच्या वसुलीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
त्यामध्ये राज्य नगरोत्थान महाअभियान योजना, बार्शीतील हिंदू स्मशानभूमी तथा मोक्षधाम येथे विद्युतदाहिनी/ गॅसदाहिनी प्रकल्प, स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या कामातील भ्रष्टाचार, स्थायी निर्देश ३० प्रमाणे बार्शी नगर परिषदेत अमंलबजावणी होत नसल्याबाबत, जी.एस. करळे, शाखा अभियंता व ई.ए. विजापुरे शाखा अभियंता यांच्या बार्शी नगर परिषदेकडील प्रतिनियुक्ती, नगर परिषद मालकीच्या जागेतील मुरूम, दगड चोरी या संपूर्ण मुद्यांच्या अनुषंगाने सखोल तपासणीअंती योग्य ती कारवाई करावी, तसेच इतर गैरव्यवहारांबाबत आपण संधी दिल्यास योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह माहिती देण्यास मी तयार आहे. तरी योग्य कारवाईची अपेक्षा. अशी तक्रार अक्कलकोटे यांनी २६ जुलै २०१९ व ९ जानेवारी २०२० रोजी दिली होती. त्यावर कॅगने या तक्रारीच्या अनुषंगाने प्रारूप निरीक्षण अहवालात समावेश केल्याचे पत्रान्वये कळवले होते; परंतु अहवालाची प्रत अप्राप्त होती, ती प्राप्त झाली आहे, असे अक्कलकोटे यांनी सांगितले.