सोलापूर : शेतकºयांच्या उत्पन्न वाढीस मदत करणाºया झेडपीतील १३ प्रकारची रिक्त पदे भरण्यास शासनाने सोमवारी मंजुरी दिली आहे. या भरतीत शासनाने केलेल्या मराठा आरक्षण विधेयकाच्या अनुषंगाने रिक्त पदाच्या बिंदूनामावलीत बदल करून सुधारित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे ९ डिसेंबरपर्यंत सादर करावा असे अध्यादेशात म्हटले आहे.
शासनाचे कार्यासन अधिकारी सं. म. खोलगाडगे यांनी जारी केलेला अध्यादेश झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांना मिळाला आहे. शेतकºयाचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडीत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ही पदे भरण्यास वित्त विभागाने १६ मे २0१८ रोजी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य सचिवांनी १ डिसेंबर रोजी बैठक घेतली. वित्त विभागाच्या निर्णयानुसार झेडपीतील १३ संवर्गाच्या पदाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील औषध निर्माता, आरोग्यसेवक पुरुष व महिला तसेच कृषी विस्तार अधिकारी आदींचा समावेश आहे़