शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

सोलापुरात ब्रॅडिंग करू पाहणाºया संस्थांना ‘लोकमत’ची संधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:01 PM

लोकमत एज्युकेशन फेअर २०१९;  हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरचा निर्णय एकाच छताखाली

ठळक मुद्देया शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्टÑातील नामवंत युनिव्हर्सिटी व शैक्षणिक संस्था सहभागी होणार लाखो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आपले अभ्यासक्रम, संस्थेची माहिती देण्याची सुवर्णसंधी, नामांकित शैक्षणिक संस्थांना एकाच छताखाली या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहेकरिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असणारे हे शैक्षणिक प्रदर्शन होणार

सोलापूर : शिक्षण म्हणजे पाल्याच्या करिअरची पहिली पायरी. मुलांची इच्छा, आवड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी योग्य अशा शैक्षणिक संस्थेची निवड करणे हे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने ‘लोकमत’ने दि. १३ जूनपासून ‘लोकमत एज्युकेशन फेअर’  शैक्षणिक प्रदर्शनाची संधी महाविद्यालयीन युवक-युवतींना दिली असून, या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी श्ौक्षणिक संस्थांसाठी आता मोजकेच स्टॉल्स राखीव ठेवले आहेत. 

शहरातील सिद्धेश्वर मंदिर शेजारील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात १३ ते १५ जूनदरम्यान होणाºया या प्रदर्शनास ‘द युनिक अकॅडमी’चे प्रायोजकत्व लाभले असून, अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीचे सहप्रायोजकत्व लाभले आहे. तसेच बँकिंग पार्टनर म्हणून ‘एसबीआय’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्टÑातील नामवंत युनिव्हर्सिटी व शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत.  लाखो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आपले अभ्यासक्रम, संस्थेची माहिती देण्याची सुवर्णसंधी, नामांकित शैक्षणिक संस्थांना एकाच छताखाली या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होत आहे. प्रदर्शनात सहभागी शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी, पालक यांच्याशी वैयक्तिक  संवाद साधून आपल्या संस्थेबाबतची माहिती देता येईल. करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असणारे हे शैक्षणिक प्रदर्शन होणार आहे. गेली अनेक वर्षे सोलापूरकरांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. 

पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअर आणि शिक्षणाच्या अनेक शंका, प्रश्न असतात. या प्रदर्शनात त्यांचे निराकरण आणि त्यांच्या अनेक प्रश्नांना अचूक उत्तरे मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे. या प्रदर्शनात शैक्षणिक संस्थांच्या माहितीसह मुलांच्या व्यक्तिमत्त्व कौशल्याचा विकास, बुद्धिमत्ता विकासाला चालना देणाºया विविध स्पर्धा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन आणि चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.

या संस्था होऊ शकतात सहभागीमेडिकल, इंजिनिअरिंग्ां, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटी, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजेस, पॉलिटेक्निक, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या क्षेत्रांतील नामांकित शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रदर्शनात सहभाग घेऊ शकतात.

या ठिकाणी होणार प्रदर्शन- सोलापूर : १३ ते १५ जून(स्थळ : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर)गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ१० वी व १२ वी परीक्षेत ८० % हून अधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ कार्यक्रमस्थळी केला जाईल.

 सेतू सेवादालन १० वी, १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शैक्षणिक कागदपत्रांसोबत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला अशा विविध कागदपत्रांची आवश्यकता लागते. खास विद्यार्थी  व पालकांच्या सोयीसाठी या प्रदर्शनस्थळी सेतू सेवा दालनातर्फे या दाखल्यांसाठी लागणाºया कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटLokmatलोकमत