पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़ त्यामुळे पहाटेपासून प्रवास करून आलेले वारकरी जेवणाचे काय? असे म्हणताच त्यांना ज्वारीची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी देण्यात आली़ त्यानंतर काही तरुण व वृद्ध वारकरी चिडून आम्हाला शिळी भाकरी दिल्याची तक्रार माध्यमासमोर केली. त्यावर स्पष्टीकरण करताना आयोजक म्हणाले, कडक भाकरी आणि शेंगाची चटणी हा सोलापुरी खास मेनू आहे़ शिवाय केळी आणि राजगिरा लाडूही असल्याचे सांगून तक्रारदारांना शांत केले.
या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी श्रीकांत भारती, उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो, सुहास जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विठ्ठल पाटील तसेच महाराज मंडळी उपस्थित होते.
दिवाकर रावते म्हणाले, वारकरी संप्रदाय हा प्रमुख भक्तीचा मार्ग आहे़ या मार्गाचे आराध्य दैवत पांडुरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आहे. वारकरी हा महाराष्ट्राचे संस्कार व संस्कृती जपणारा आहे. या संस्काराच्या बळावर पंढरीत येणाºया भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणाºया वारकरी व भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवासाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाने विविध सवलतधारी प्रवाशांना आधारकार्ड सलग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे़ या स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकूलित शयनयान बसचे लोकार्पण दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले़यावेळी संत नामदेवांचे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह. भ. प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर यांच्यासह अन्य महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, महादेव महाराज शिवणीकर, बद्रिनाथ तनपुरे महाराज आदी महाराज मंडळी यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक उपस्थित होते.
संतांच्या वंशजांच्या हस्ते भूमिपूजनच्एसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाचे भूमिपूजन संत नामदेवांचे वंशज ह. भ. प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह. भ. प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह. भ. प. संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला. संतांच्या वंशजांच्या हस्ते हा सोहळा पार पडल्याने उपस्थित वारकºयांनी टाळ्या वाजवून या उपक्रमाचे स्वागत केले़
यात्रीनिवास वारकरी सांप्रदायाला समर्पितसंताचे व वारकºयांचे माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्या वतीने ३३ कोटी रुपये खर्चून यात्री निवास व सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात येणार आहे़ हे वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी केली.