संताजी शिंदे, सोलापूर : सोलापूर हे श्रमिक व कष्टकऱ्यांचे जसे गाव आहे, तसे माझे अहमदाबादही श्रमिकांचे गाव आहे. दोन्ही गावाची तुलना केली तर श्रमिकांचे गाव आहे. याच सोलापूरातील पद्मशाली समाजाचे लोक अहमदाबादमध्ये आले आहेत. लहानपणी मी या लोकांसमवेत मी रहात होतो. घरात बसायला जागा नव्हती तरीही ते मला समजून घेत होते. छोट्याशा घरात मला त्या लोकांनी मला कधीही उपाशी झोपू दिले नाही. मला पोटभर अन्न देत होते.
कष्टकरी असलेल्या सोलापूरातील लोकांचे प्रेम मला कायम आठवणीत राहील. अतिशय बिकट अशा परिस्थितीचा सामना करीत मी राजकारणात आलो. मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे सोलापूकरांचा अन माझा खूप जुना संबंध आहे असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.