पंढरपूर : श्री विठ्ठल प्रक्षाळपूजेबाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट सुलट चर्चा सुरू केली. त्यामुळे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विठ्ठलाच्या गाभार्यात प्रवेश नाकारला आहे. यामुळे या निर्णयाच्या विरोधात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी संघाने एक ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
आषाढी यात्रा २०२० मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा ०९ जुलै २०२० रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली. या पूजेच्या बाबतीत काही संघटनांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या द्वेषापोटी उलट सुलट चर्चा सुरू केली. त्याबाबतच्या तक्रारी दिल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सभा घेवून मंदिरातील अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही स्वरूपाची खातरजमा व वस्तुस्थितीची शाहनिशा न करता श्री विठ्ठल व रूक्मिणी गाभारा येथे प्रवेश बंदी केली आहे. तथापि मंदिर समितीने केलेली कारवाई नैसर्गीक न्याय तत्वाला अनुसरून नाही.
तसेच सदरची प्रक्षाळपुजा अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रूढी व परंपरेनुसार झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर गाभारा बंदीचा घेतलेला निर्णय मंदिर समितीने तात्काळ मागे व्यावा. असे प्रसिद्धीपत्रक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या ईमेल आयडी वरून देण्यात आले आहे.---------------------------अन्यथा १ ऑगष्ट २०२० पासून मंदिर समितीकडील सर्व कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करतील. असा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघाने घेतला आहे. - राजाभाऊ राऊत,अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचारी संघ, पंढरपूर