शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार २८९३ कारखानदारांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 10:37 AM

औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना दणका; महावितरणची २९ दिवसात मोठी कारवाई, वीजचोरांवर कारवाई

ठळक मुद्देमहावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीमचालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोयवाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार २८९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार २८९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, ८०२४ थकबाकीदारांनी ३ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाºया वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीज बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी आॅनलाईन तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे.

 वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून मीटर रीडिंगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. यासोबतच वीज बिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीज बिल भरण्याची मुदत आदींच्या माहितीसह वीज बिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश एसएमएसद्वारे ग्राहकांना पाठविला जात आहे. वीज बिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील एसएमएसद्वारे दिली जात असल्याचे महावितरणने सांगितले़ यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता मोठया संख्येने उपस्थित होते़

जिल्ह्यात झालेल्या कारवाईवर एक नजऱ- गेल्या महिनाभरात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज विभागात थकबाकीदार असलेल्या वाणिज्यिक व औद्योगिक १११२ ग्राहकांनी ३६ लाख ५ हजार रुपयांचा भरणा केला तर २३ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ४८१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बार्शी विभागात २५५२ थकबाकीदारांनी १ कोटी १० लाख रुपयांचा भरणा केला तर ५० लाख ९२ रुपयांची थकबाकी असलेल्या ६७३ ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. पंढरपूर विभागात १३३१ थकबाकीदारांनी ४७ लाख ९ हजार रुपयांचा भरणा केला तर २२ लाख रुपयांच्या थकबाकीदार ४१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोलापूर शहर व ग्रामीण या दोन विभागात ३०२९ थकबाकीदारांनी १ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला तर ८८ लाख १३ हजारांची थकबाकी असलेल्या १३२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

अनधिकृतपणे विजेचा वापर केल्यास होणार गुन्हा - तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचेही अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले़

सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे़ थकबाकीदार ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे़ - ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणbusinessव्यवसाय