नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत ऊसतोडणी हंगाम असतो. मात्र, यावर्षी प्रारंभी पाऊस पडल्यामुळे तोडणी हंगाम उशिरा सुरू झाला. त्यानंतर कारखान्यांना उसाचा लोड झाल्यामुळे तोडणीप्रक्रिया धिम्या गतीने सुरू होती. सध्या ऊन वाढू लागल्यामुळे तोडणी प्रक्रिया मंदावणे साहजिकच आहे. यातच उसाची उपलब्धता कमी होऊ लागल्यामुळे सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत तोडणी मजूर काम करताना दिसत आहेत.
शिवारात गजबज
शिवारात टाकलेल्या मजुरांच्या राहुट्या, पहाटे व रात्री उशिरापर्यंत तोडणी, वाहनांमध्ये ऊस भरणी, वाहतूक करणाऱ्या वाहनांसह रस्त्याने ये-जा करणारी वाहने यामुळे रात्री-अपरात्री ऊस तोडणी यंत्रणेचा वावर सुरू असल्यामुळे सध्या शेता शिवारात गजबज दिसत आहे.
कोट ::::::::::::::::::
ऊसतोड हंगामात मिळणारी मजुरी टनाप्रमाणे दिली जाते. जास्तीत जास्त ऊस तोडणी झाली तरच तोडणी हंगाम फायदेशीर होतो. त्यामुळे ऊस तोडणीसाठी वेळेचे बंधन पाळून चालत नाही. यातच उष्णता वाढत चालल्यामुळे सकाळी व रात्री काम करणे सोयीचे होते.
- आप्पा गोरड
ऊस तोडणी मुकादम, गोरडवाडी
फोटो :::::::::::::::::::::
शेता-शिवारात रात्री उशिरा उसाची ट्रॉली भरताना ऊसतोड मजूर.