यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. महिनाभरात काम न सुरु झाल्यास अधिकाऱ्यांना बसवून जाब विचाण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
या वेळी मोहन बारबोले, मालोजी आडकर, शंभू साठे, पंडित साळुंखे, औदुंबर नवले, लक्ष्मण कदम, संतोष जगदाळे, संतोष साठे, बाळासाहेब उबाळे, औदुंबर उबाळे, विशाल बारबोले, विकास बारबोले, रूपेश आडकर, अभिजित साळुंखे, मोहन होनराव, विकास जाधव, विठ्ठल मस्के, गणेश शिंदे, महेश बिस्किटे, सागर बारबोले, सुधीर उबाळे, दीपक उबाळे, सोमनाथ गिड्डे, परमेश्वर चव्हाण, आप्पासाहेब बारबोले, ज्ञानेश्वर बारबोले, संतोष कवले, अमर साळुंखे, सोमा शिंदे यांच्यासह दारफळ सिना, जामगाव, उंदरगाव, केवड, सुलतानपूर आदी गावांतील नागरिक उपस्थित होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, मोहम्मद शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाझीर नाईकवाडी व आनंद नाजरे, मंडलाधिकारी प्रकाश चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.
----
खड्ड्यात बसवून अधिकाऱ्यांना जाब विचारु
महिनाभरात रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पडलेल्या खड्ड्यात अधिकाऱ्यांना बसवून जाब विचारु. यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारणार आहोत. रस्त्याचे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मुळे तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाली असून यापुढे असे प्रकार चालणार नाही, असे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.
-----
दीड हजाराच्या वाहतुकीला दहा हजार खर्च
गेल्या कैक वर्षांपासून रस्त्याचा हा वनवास संपता संपेना. शेतातलं मिरचीची वाहतूक करण्याासाठी प्रत्येक खेपेला ट्रक्टरनं दोन किलोमीटर अंतरासाठी ६०० ते ७०० रुपये प्रमाणे असे १० हजार रुपये मोजावे लागले. रस्ता असता तर १ ते दीड हजारात हे काम झाले असते, अशा भावना दिव्यांग शेतकरी लक्ष्मण कदम यांनी व्यक्त केल्या.
---
फोटो ओळी : दारफळा फाटा (ता. माढा) येथे रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी रास्ता रोको करताना प्रभाकर देशमुख यांच्यासह नागरिक.---फोटो १७माढा
170921\img_20210917_122246.jpg
माढ्यातील दारफळ सीना रस्त्यावर रस्ते दुरुस्ती करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.