उपजिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने स्ट्रेचरवर ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे १५० व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला ८० बेड, असे एकूण २३० क्षमतेचे दोन कोविड केअर केंद्र आहेत. चव्हाण महाविद्यालयात २९५, तर आंबेडकर प्रशालेत १६२, असे क्षमतेपेक्षा दुप्पट बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन डेडिकेटेड कोविड केंद्रे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० बेड, कमलाई हॉस्पिटल २५ बेड, शहा हॉस्पिटल येथे १० बेड उपलब्ध करून देण्यात आलेले असून, ते सर्व बेड गेल्या आठ दिवसांपासून फुल आहेत. जेऊर ग्रामीण रुग्णालयास ३० बेडची मंजुरी असून, अद्याप ते सुरू झालेले नाही.
-----
रस्त्याच्या कडेलाच लावला ऑक्सिजन
गुळसडी (ता. करमाळा) येथील सुभान शेख हा रुग्ण शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशी कमी झाल्यामुळे उपचार घेत होता. दरम्यान, त्यास कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारसाठी तो १८ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयात गेला; पण तेथे बेड शिल्लक नसल्याने तो रुग्णालयासमोर दीड तास ताटकळत बेडच्या प्रतीक्षेत होता. अखेर त्यास रस्त्याच्या कडेलाच त्या खाजगी डॉक्टरने ऑक्सिजन लावून प्राथमिक उपचार करून परंडा येथे पाठवले. तेथून तो बार्शीत अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
-----
कोट घेणे..
करमाळ्यात एकाही रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारसाठी बार्शी, अहमदनगर येथे हलवावे लागत आहे. तेथे गेल्यानंतरही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाचा जीव जात आहे. करमाळ्यात ऑक्सिजन बेड वाढवावेत.
-बबन आरणे, नागरिक
----
सध्याच्या दोन कोविड केअर सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने बाजार समितीचा हॉल, करमाळा नगर परिषदेच्या गाळ्यासह शहरातील मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही स्वयंसेवी संस्था व नेतेमंडळी स्वत: पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू करू इच्छित आहेत.
-समीर माने, तहसीलदार
-----
उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितावर इलाजासाठी १० बेडला ऑक्सिजनची सोय असून, सर्व बेड गेल्या आठ दिवसांपासून फुल आहेत. तातडीच्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्ट्रेचरवर झोपवून ऑक्सिजन देऊन इलाज केला जात आहे.
-डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय
२१ करमाळा-कोरोना
गुळसडी (ता. करमाळा) येथील सुभान शेख हा बाधित रुग्ण ऑक्सिजनसह उपजिल्हा रुग्णालयासमोर बेडच्या प्रतीक्षेत दिसत आहे.