अक्कलकोट : दरवर्षी विवेकानंद परिवाराकडून सामुदायिक विवाह सोहळ्यावर होणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च कोरोना काळात वाचला आहे. त्याचा सदुपपयोग विधानसभा क्षेत्रातील कोरोना रुग्णांसाठी केला आहे. सुरू केलेल्या १०० ऑक्सिजन बेडची सुविधा गोरगरीब रुग्णांसाठी एक वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अक्कलकोट येथे आमदार कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी मोफत सुरू केलेल्या शंभर ऑक्सिजन बेड हॉस्पिटलचे सोशल मीडिया लाइव्हद्वारे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, अक्कलकोटमध्ये डॉक्टरांची मेहनत फळास येऊन चांगल्या प्रकारे रुग्णसेवा घडेल. कोरोनाच्या प्रकोप अक्कलकोटसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. तरीही औषधे व उपकरणे सोलापूरला पुरविण्यात राज्य सरकारकडून दुजाभाव होतो आहे, हे बरोबर नाही. यातूनही संघर्ष करीत मार्ग काढला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू झालेल्या ९० ऑक्सिजन, तसेच १० बायपॅप बेडची सुविधा ही रुग्णांसाठी मोलाची ठरणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेला सेवा हेच संघटन हा मूलमंत्र अंगीकारत देशभरात प्रत्येक भाजप कार्यकर्ता जमेल.
प्रारंभी आमदार कल्याणशेट्टी यांनी ही डीसीएचसी केंद्र उभारण्याची निर्माण झालेली गरज, त्यासाठी आलेल्या अनंत अडचणी आणि त्यातून काढण्यात आलेला मार्ग, तसेच प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले योगदान याचा उल्लेख केला.
याप्रसंगी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, डॉ. अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे, डॉ. निखिल क्षीरसागर, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, यशवंत धोंगडे, राजेंद्र बंदिछोडे, अप्पासाहेब बिराजदार, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, उत्तम गायकवाड, जितेंद्र यारोळे, अविनाश मडिखांबे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, प्रदीप पाटील, ऋषी लोणारी, संकेत कुलकर्णी, महेश भोरे, अतिष पवार, नन्नू कोरबू, अकुंश चौगुले यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
---
फोटो : १९ अक्कलकोट
अक्कलकोट येथील कोरोना हॉस्पिटलचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोशल मीडिया लाइव्हद्वारे झाले. यावेळी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, डॉ. राठोड, डॉ. करजखेडे, डॉ. निखिल क्षीरसागर.